कत्तलीसाठी नेणाऱ्या १० जनावरांची सुटका

By admin | Published: June 10, 2017 12:13 AM2017-06-10T00:13:38+5:302017-06-10T00:13:38+5:30

कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचा ट्रक शेंदूरजना घाट पोलिसांनी बरेचदा पकडून स्थानिक राष्ट्रमाता गोरक्षणकडे सुपूर्द केले.

10 rescued animals released for slaughter | कत्तलीसाठी नेणाऱ्या १० जनावरांची सुटका

कत्तलीसाठी नेणाऱ्या १० जनावरांची सुटका

Next

गोमांस जप्त : शेंदूरजन्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंदूरजनाघाट : कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचा ट्रक शेंदूरजना घाट पोलिसांनी बरेचदा पकडून स्थानिक राष्ट्रमाता गोरक्षणकडे सुपूर्द केले. मात्र कार्यवाही करून ही गोवंश हत्या काही केल्या थांबत नाही, असे चित्र सगळीकडेच बघायला मिळाले.
ठाणेदार शेषराव नितनवरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. आशीष एम गंद्रे, पो.हे. लक्ष्मण साने, पो. शि. मेटकर, अतुल मस्के, स्वप्निल बायस्कर, नरेश घुगे, चंद्रकांत केंद्रे, रत्नदीप वानखडे, गजानन पवार व निकीराज कराळे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुसली शिवारातील मुकीम कुरेशी याचे शेतावर धडक दिली असता आठ गाई, दोन गोऱ्हे मिळून दहा जनावरे, चाकू, कुऱ्हाड दिसले ते जप्त करण्यात आले व मुख्तार अहमद यांचे शेतात अंदाजे ५० किलो गोमांस आढळून आले ते पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. याप्रकरणी भादंविच्या कलम ५ ब, ५ क, ७, ९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ सह कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Web Title: 10 rescued animals released for slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.