१०,२१८ शेतकऱ्यांची तूर खरेदी बाकी

By admin | Published: May 7, 2017 12:04 AM2017-05-07T00:04:09+5:302017-05-07T00:04:09+5:30

जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रात अद्याप १ हजार २१८ शेतकऱ्यांची १ लाख ९४ हजार ४९२ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे.

10,218 farmers have yet to buy turmeric | १०,२१८ शेतकऱ्यांची तूर खरेदी बाकी

१०,२१८ शेतकऱ्यांची तूर खरेदी बाकी

Next

तूर केंद्राची सद्यस्थिती : यार्डात १.९४ लाख क्विंटल मोजणी शिल्लक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रात अद्याप १ हजार २१८ शेतकऱ्यांची १ लाख ९४ हजार ४९२ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. शुक्रवारपर्यंत ११ केंद्रांवर ३ हजार ८०१ शेतकऱ्यांची ७७ हजार ५५३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
२७ एप्रिल रोजी राज्य शासनाद्वारे तूर खरेदीचा निर्णय घेतला. २ मे नंतर खऱ्या अर्थाने तूर खरेदीला सुरुवात झाली. आतापर्यंत व्हीसीएमएफच्या चांदूररेल्वे केंद्रावर १४५ शेतकऱ्यांची २१६२.२८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. नांदगाव केंद्रावर २२० शेतकऱ्यांची ४०७९.३१ क्विंटल, मोर्शी केंद्रावर ५६० शेतकऱ्यांची १८ हजार ७०६ क्विंटल, अमरावती केंद्रावर २६२० शेतकऱ्यांची ४६ हजार क्विंटल व धामणगाव रेल्वे केंद्रावर ४३२ शेतकऱ्यांची २१ हजार २५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
डीएमओंतर्गत अचलपूर केंद्रावर २३७९ शेतकऱ्यांची ४७ हजार ३२६ क्विंटल, अंजनगाव सुर्जी केंद्रावर ११२६ शेतकऱ्यांची २१ हजार ७०३ क्विंटल, चांदूरबाजार केंद्रावर १६१० शेतकऱ्यांची १९ हजार ८३५ क्विंटल, दर्यापूरात ३६२१ शेतकऱ्यांची ४९ हजार ६९६ क्विंटल, वरूड केंद्रावर ९८२ शेतकऱ्यांची ३३ हजार ९१ तसेच धारणी येथील आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने १७४ शेतकऱ्यांची तीन हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधक, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याद्वारा केंद्रावर रोज भेट देण्यात येत असल्याने येणाऱ्या अडचणीवर लगेच तोडगा काढण्यात येत असल्याने तूर खरेदी व मोजणीचा वेग वाढला आहे.

व्यापाऱ्यांद्वारे ८.२३ लाख क्विंटल तूर खरेदी
यंदाच्या हंगामात व्यापाऱ्यांद्वारे ८ लाख २३ हजार ९२५ क्विंटल तुरीची हमीपेक्षा कमी भावाने खरेदी करण्यात आली. यामध्ये चांदूररेल्वे ५,७३०.७७ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर ३,८४७, मोर्शी -३१,६४२ क्विंटल, अमरावती ३,२१,८५२ क्विंटल ,धामणगाव ७४,३५८, अचलपूर ८० हजार, अंजनगाव सुर्जी ५७,७४३, चांदूरबाजार ७६,२६१, दर्यापूर १,६२,३४७, वरूड ५,८००, धारणी ३,८४७, तिवसा येथील बाजार समितीत ४९७ क्विंटल तूर व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे.

Web Title: 10,218 farmers have yet to buy turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.