वरूड तालुक्यात एकाच दिवशी १०४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:12 AM2021-04-14T04:12:08+5:302021-04-14T04:12:08+5:30
वरूड तालुक्यात कोरोना संसर्गित २० ते ४० रुग्ण दररोज निघत आहेत. मात्र, ९ एप्रिलच्या तपासणीत तब्बल १०४ कोरोनाग्रस्त आढळून ...
वरूड तालुक्यात कोरोना संसर्गित २० ते ४० रुग्ण दररोज निघत आहेत. मात्र, ९ एप्रिलच्या तपासणीत तब्बल १०४ कोरोनाग्रस्त आढळून आले, तर आतापर्यंत कोरोनाने तालुक्यात सहा जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील नरखेड, जलालखेडा, मोवाड, थडी पवनी, अंबाडा, वर्धा जिल्ह्यातील साहूर, आष्टी, तारासावंगा येथील रुग्ण वरूड मधे उपचाराकरिता येतात. लगतच्या मध्यप्रदेशातील पांढुर्णा, सौंसर, मूलताई, भैसदही, आठनेर, पट्टणपासून रुग्णांचीही गर्दी असते. याबाबत कोण पॉझिटिव्ह, कोण निगेटिव्ह, याची माहिती नसल्याने कोरोना संसर्गाची लागण होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना, कुठेच कन्टेन्मेन्ट झोन किवा संचारबंदी असा प्रकार दिसून येत नाही.
-------------
तालुक्यात जिल्ह्याबाहेरील मध्यप्रदेशातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. तालुका प्रशासन रुग्णाची माहिती घेऊन निर्णय घेईल. विनामास्क व्यक्तींना दंड, जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करू.
- किशोर गावंडे, तहसीलदार, वरूड
------------
वरूड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात अडीचशेपेक्षा अधिक चाचण्या केल्या जात आहेत. स्थितीवर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल देशमुख यांनी सांगितले.