१०६ ग्राहकांना वीजचोरी करताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:53+5:302021-07-29T04:13:53+5:30

अमरावती : मीटरमध्ये छेडछाड करणे, ज्या कामासाठी वीज घेतली त्यानुसार वापर न करता त्याचा कमर्शियलकरिता वापर करणे तसेच डायरेक्ट ...

106 customers caught stealing electricity | १०६ ग्राहकांना वीजचोरी करताना पकडले

१०६ ग्राहकांना वीजचोरी करताना पकडले

Next

अमरावती : मीटरमध्ये छेडछाड करणे, ज्या कामासाठी वीज घेतली त्यानुसार वापर न करता त्याचा कमर्शियलकरिता वापर करणे तसेच डायरेक्ट विद्युत तारेवरून हूक टाकणे अशाप्रकारे वीजचोरी करणाऱ्या १०६ वीजग्राहकांना महावितरणाच्या स्थानिक पथकाने कारवाई करून वीजचोरी पकडली. ही कारवाई गत वर्षभरातील असल्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यामध्ये कलम १३५ ते १३६ नुसार वीजचोरीची दंडात्मक रक्कम भरण्याची संधी दिली जाते. रक्कम न भरल्यास एफआयआर केला जातो. अशाप्रकारे एकूण ९६ ग्राहकांनी २,२६,५१५ युनिटची वीजचोरी केली आहे. त्याची रक्कम ३४.८४ लाख इतकी आहे. त्यापैकी ७१ लोकांकडून २६.६० लाख वीजचोरीची रक्कम वसूल केल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

१० जण हूक टाकताना आढळले

ज्या कामासाठी वीज घेतली, त्याकामासाठी त्याचा वापर न करता त्याचा व्यवसायिक किंवा वाणिज्य वापर होत असेल तर कलम १२६ नुसार हा गुन्हा ठरतो. अशा तारेवर हूृक टाकून वीजचोरी करणाऱ्या ५० जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० जणांनी हूक टाकून वापरल्याचे महावितरणला आढळून आले. त्यांनी ९०२३ युनिट विजेची चोरी केली असून त्याची रक्कम १ लाख २९ हजार एवढी आहे. १० पैकी ५ जणांकडून ४२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

बॉक्स:

अशी आहे कारवाईची तरतूद

वीजचोरीचे कलम १२६ अंतर्गत ज्यासाठी वीज घेतली, त्यासाठीच त्याचा वापर न करता इतर बाबींसाठी केल्यास त्याला कमर्शियलचे दर लावून त्याचे बिलिंग केले जाते. पैसे न भरल्यास एफआयआर दाखल केला जातो.

कलम १३५ ते १३८ अंतर्गत थेट वीजचोरी करणे, यामध्ये तारेवर हूक (आकोडा) टाकून वीजचोरी करणे, मीटरला बायपास करणे, मीटरला आतून छिद्र पाडून मीटरमध्ये रेजीस्टन तयार करून मीटरची गती कमी करणे, मीटरमध्ये रिमोट कंट्रोल किट बसविणे आदीद्वारा वीजचोरी केली जाते. याची तक्रार पोलिसातसुद्धा दाखल केली जाते.

कोट

अधीक्षक अभियंत्यांचा कोट आहे.

Web Title: 106 customers caught stealing electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.