१०६ तलाठी साझे, १८ मंडळांची निर्मिती, महसुली कामकाज होणार गतिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 04:26 PM2017-11-07T16:26:21+5:302017-11-07T16:27:05+5:30

अमरावती : नागपूरचे तत्कालीन विभागीय आयुक्त अनूपकुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या परिमाणानुसार विभागातील तलाठी साझे व मंडळ यांची पुनर्रचना करण्यात आलीे.

106 Talathi sharing, 18 posts for the formation of the circle, revenue will be increased | १०६ तलाठी साझे, १८ मंडळांची निर्मिती, महसुली कामकाज होणार गतिमान

१०६ तलाठी साझे, १८ मंडळांची निर्मिती, महसुली कामकाज होणार गतिमान

googlenewsNext

- गजानन मोहोड
अमरावती : नागपूरचे तत्कालीन विभागीय आयुक्त अनूपकुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या परिमाणानुसार विभागातील तलाठी साझे व मंडळ यांची पुनर्रचना करण्यात आलीे. यानुसार संबंधित जिल्हाधिका-यांनी ३१ आॅक्टोबरला अंतिम प्रारूप तयार केले आहे.

लोकसंख्या, खातेदार व भौगोलिक क्षेत्राच्या गुणांकानुसार विभागात १०६ तलाठी साझांची व १८ महसूल मंडळांची वाढ करण्यात आली. यामुळे महसुली कामकाज सोईचे होणार आहे. तलाठी साझांच्या संख्यावाढीबाबत शासनाच्या महसूल विभागाने २५ मे २०१८ व प्रधान सचिवांनी १ जून रोजी आदेशित केले होते. विभागीय आयुक्त अनूपकुमार समितीने जाहीर केलेल्या निकषानुसार तलाठी साझ्यांची संख्यावाढ करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती विभागातील महापालिका क्षेत्रात १६ व महापालिकेच्या झालर (१० किमी परिसर) क्षेत्रात २, अकोला महापालिका क्षेत्रात ३ व झालर क्षेत्रात ५ साझ्यांची पुनर्रचना करण्यात आली. नगरपालिका क्षेत्रात ५, नगरपंचायत क्षेत्रात १४, ग्रामीणमध्ये ३९, आदिवासी क्षेत्रात १६ नवीन साझ्यांची निर्मिती करण्यात आली.

राज्यातील तलाठी साझा निर्मितीचे निकष ठरविण्यासाठी सन १९७४ मध्ये कपूर समिती स्थापित करण्यात आली होती. या समितीच्या निकषानुसार १९८३ मध्ये नवीन साझांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर आता २०१५ मध्ये अनूपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीने सुचविलेल्या निकषानुसार १०० गुणांचे सूत्र तयार करण्यात आले. त्यानुसार ५०० खातेदार असल्यास ४० गुण, १८०० हेक्टर शेती कार्यक्षेत्रात असल्यास ३० गुण, हजार लोकसंख्या असल्यास १० गुण व चार गावांची संख्या असल्यास १० गुण या निकषानुसार साझ्यांची निर्मिती करण्यात आली.

ग्रामीणमध्ये ३९, अदिवासी क्षेत्रात १६ साझांची वाढ
धारणी उपविभागातील धारणी तालुक्यात ९ व चिखलदरा तालुक्यात ७ असे एकूण १६ साझ्यांची संख्यावाढ होणार आहे. हे दोन्ही तालुके अतिदुर्गम व जंगलाने व्याप्त आहेत. त्यामुळे येथील पुनर्रचना करताना भौगोलिक संरचना, दोन गावांमधील अंतर, उपलब्ध दळणवळणाच्या साधनांचा विचार करण्यात आला. पेसा कायद्यांतर्गत जी महसुली गावे नाहीत, ती महसुली गावे म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात महसुली गावे वाढणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीणमध्ये १६ साझ्यांची वाढ होणार आहे.

नव्याने साझ्यांची संख्यावाढ
विभागात साझ्यांच्या संख्येत १०६ ने वाढ झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात ५५८ साझे झालेत. ३४ नवीन साझे आहेत. अकोला जिल्ह्यात अस्तित्वातील ३१० व ८ नवीन असे ३१८, यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्वातील ६२८ व नवीन ५४ असे ६८२, बुलडाणा जिल्ह्यात अस्तित्वातील ५२५ व नव्याने १० असे ५३५ साझे झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात जैसे थे स्थिती आहे. विभागात अस्तित्वातील ३७७ व नव्याने १८ असे ३९५ महसूल मंडळांची संख्या राहणार आहे. यामध्ये अमरावती ६, अकोला १, यवतमाळ ९ व बुलडाणा जिल्ह्यात २ मंडळे वाढणार आहेत.

तलाठी, कोतवाल पदांची होणार निर्मिती
जिल्ह्यासह राज्यात ३,१६५ तलाठी साझे व ५२८ महसूल मंडळांची नव्याने निर्मिती होणार असल्याने स्वाभाविकच तलाठी व कोतवालपदांची भरती होणार आहे तसेच मंडळ अधिकाºयांची पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. विभागात तलाठ्यांची २,२८९ पदे मंजूर आहेत. यापैकी १११ रिक्त आहेत. मंडळ अधिकाºयांची ४०२ पदे आहेत. यामध्ये सात पदे रिक्त आहेत. आता नव्याने वाढलेली पदनिर्मिती होणार आहे.

Web Title: 106 Talathi sharing, 18 posts for the formation of the circle, revenue will be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.