१०८ रुग्णवाहिका लाखो रुग्णांकरिता ठरली देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 03:44 PM2018-10-20T15:44:52+5:302018-10-20T15:46:55+5:30

शासनाने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा आपत्कालीन स्थितीत देवदूत बनून येत असल्यामुळे लाखो नागरिकांसाठी ती जीवनदायिनी बनली आहे.

108 Ambulance as an angel for millions of patients | १०८ रुग्णवाहिका लाखो रुग्णांकरिता ठरली देवदूत

१०८ रुग्णवाहिका लाखो रुग्णांकरिता ठरली देवदूत

Next
ठळक मुद्देराज्यात बीव्हीजीकडून संचालन३३ लाख लोकांना मिळाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क
वैभव बाबरेकर
अमरावती : शासनाने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा आपत्कालीन स्थितीत देवदूत बनून येत असल्यामुळे लाखो नागरिकांसाठी ती जीवनदायिनी बनली आहे. पाच वर्षांत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने राज्यातील ३२ लाख ८८ हजार ८७० रुग्णांना रुग्णालयांत पोहचवून अनेकांचे विश्वास संपादन केले आहे.
या रुग्णवाहिका सेवेचे संचालन महाराष्ट्रात बीव्हीजी इंडिया लिमिटेड व यूके सास यांच्यामार्फत केले जाते. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी २६ जानेवारी २०१४ रोजी या रुग्णवाहिका सेवेची सुरुवात झाली. २३ मूलभूत जीवनरक्षक प्रणाली आणि सहा अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणालीने सज्ज असलेल्या या रुग्णवाहिका १२ प्रकारच्या तातडीच्या आजारी रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवून उपचार मिळण्यास यशस्वी ठरल्या आहेत. त्यामध्ये अपघात (वाहन) प्रकरणी २ लाख ८७ हजार २३०, मारहाणप्रकरणी ४० हजार १३०, जाळून घेतलेल्या १७ हजार ६५०, हृदयविकारचे ११ हजार ४०, बाल जन्मप्रकरणी २१ हजार ३९१, उंचावरून पडलेले ९१ हजार ९५७, उन्माद/ विषबाधा प्रकरणी १ लाख ९ हजार ७१४, गर्भवती/प्रसूतीप्रकरणी ८ लाख ९ हजार ६९९, मोठ्या दुर्घटनेतील १७ हजार ३८४, वैद्यकीय उपचाराकरिता १५ लाख ६२ हजार ७०८, पॉली ट्रॉमाचे ७४१४ आणि इतर ३ लाख १२ हजार ५५३ अशा वर्गवारीतून तब्बल ३२ लाख ८८ हजार ८७० रुग्णांना राज्यातील विविध कानाकोपऱ्यांतून संबंधित जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणून दाखल करण्यात आले आहे.

अमरावतीत २९ रुग्णवाहिका
अमरावती जिल्ह्याकरिता १०८ क्रमांकाच्या २९ रुग्णवाहिका विविध आरोग्य केंद्रांना संलग्न आहेत. २०१४ पासून या रुग्णवाहिकांकडून वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढतीच आहे. २०१४ मध्ये ६९३०, २०१५ मध्ये ११ हजार २५, २०१६ मध्ये २२ हजार ३४३, २०१७ मध्ये २२ हजार ५२६, २०१८ मध्ये आतापर्यंत ४५ हजार ५५५ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.

मेळघाटात मोबाइल रुग्णवाहिका
मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात चारचाकी वाहने पोहोचणे कठीण असलेल्या ठिकाणाहून रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी दुचाकी सज्ज केल्या आहेत. अशा पाच मोबाइल रुग्णवाहिका या भागात देण्यात आल्या आहेत.

भारत विकास ग्रुप इंडियाकडून रुग्णांना उपचार मिळण्यासाठी तत्पर सेवा दिली जाते. १०८ रुग्णवाहिकांद्वारे आजपर्यंत लाखो जणांना आपत्कालीन मदत देण्यात आली आहे. पुढेही ही सेवा अविरत सुरू राहील.
- सूरज धारपवार, जिल्हा व्यवस्थापक, बीव्हीजी

Web Title: 108 Ambulance as an angel for millions of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य