विदर्भातील २४,५५५ अर्धांगवायूच्या रुग्णांना ‘१०८‘ ने दिले जीवदान (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:40+5:302021-06-04T04:10:40+5:30

(लोगो, ॲम्ब्यूलन्सचा फोटो) इंदल चव्हाण अमरावती : दीड वर्षांपासून कोरोना ठाण मांडून आहे. अशातच संचारबंदी कायम असल्याने प्रत्येक व्यक्तीच्या ...

'108' saves 24,555 paralyzed patients in Vidarbha (revised) | विदर्भातील २४,५५५ अर्धांगवायूच्या रुग्णांना ‘१०८‘ ने दिले जीवदान (सुधारित)

विदर्भातील २४,५५५ अर्धांगवायूच्या रुग्णांना ‘१०८‘ ने दिले जीवदान (सुधारित)

Next

(लोगो, ॲम्ब्यूलन्सचा फोटो)

इंदल चव्हाण अमरावती : दीड वर्षांपासून कोरोना ठाण मांडून आहे. अशातच संचारबंदी कायम असल्याने प्रत्येक व्यक्तीच्या दिनचर्येवर परिणाम झाला आहे. नियमित मॉर्निंग वॉक, व्यायाम करता येत नाही. निसर्गाच्या सानिध्यात क्षण घालविता येत नाही. त्यामुळे शरीरावर मोठा परिणामी गेल्या चार महिन्यात विदर्भात २४,५५५ जणांना अर्धांगवायूने ग्रासले असून, आरोग्य विभागाच्या १०८ ॲम्ब्यूलन्स सेवेमुळे या रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सन २०२० च्या तुलनेत जानेवारी ते एप्रिल २०२१ या चार महिन्यात अमरावती विभागात २८.२ टक्क्यांनी अर्धांगवायूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. गत वर्षी ७३७५, तर यंदा चार महिन्यात १०२७२ रुग्णांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेने रुग्णालयात पोहचविल्यामुळे जीवदान मिळाले. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ३४६८, तर वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी १०१० इतक्या रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. शासनाने गर्दीचे ठिकाण, सार्वजनिक स्थळे, माॅल, प्रतिष्ठाने बंद केली. तसेच माॅर्निंग वॉककरिता घराबाहेर पडणाऱ्यांवर निर्बंध घातले गेले. व्यायाशाळा बंद करण्यात आल्या. खुल्या मैदानावर प्रवेश बंदी केली. त्यामुळे हाताला काम नाही. शरीराला व्यायाम नाही. घरातच सुरक्षित रहा, असाच जीवनक्रम होऊन गेल्यामुळे अनेकांची जीवनशैली बदलल्याने जानेवारी २०२० च्या तुलनेत जानेवारी ते एप्रिल २०२१ दरम्यान १०,२७२ रुग्णांना १०८ अँब्युलन्सने रुग्णालयात पोहचविल्याची माहिती महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा झोनल मॅनेजर डॉ. प्रशांत घाटे यांनी दिली.

बॉक्स

जिल्हा २०२० रुग्ण २०२१ टक्केवाढ

अकोला ५६ ६३ ११.१

अमरावती १७० १७४ २.३

बुलडाणा ४६ १७१ ७३.१

वाशीम ३२ ५२ ३८.६

यवतमाळ ८६ १०७ १९.६

एकूण ६७० ८४५ २८.२

--

विदर्भात अशी आहे अर्धांगवायूच्या रुग्णांची संख्या

अकोला १२८४

अमरावती ३४६८

भंडारा १२२१

बुलडाणा १६८५

चंद्रपूर ४०१४

गडचिरोली १६०५

गोंदिया २२६६

नागपूर ४८३१

वर्धा १२३५

वाशिम १०१०

यवतमाळ २८२५

एकूण २४५५५

कोट

जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत सन २०२० च्या तुलनेत यंदा अर्धांगवायूचे २८.२ टक्के रुग्ण वाढले. त्यांना तातडीने रुग्णालयांत पोहचविण्यात आल्याने जीव वाचविता आले. काहींना अपंगत्वातून सावरण्यास मदत झाली आहे.

डॉ. नरेंद्र अब्रुक,

जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र १०८ अँब्यूलंस

Web Title: '108' saves 24,555 paralyzed patients in Vidarbha (revised)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.