अमरावती शहरात शनिवारी पेट्रोल प्रतिलिटर १०८.३८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:28 PM2021-07-10T16:28:43+5:302021-07-10T16:34:50+5:30

Amravati News अमरावती शहरात शनिवारी पेट्रोल प्रतिलिटर १०८.३८ पैसे, तर डिझेल ९८.९४ रुपये प्रतिलिटर दराने विकण्यात आले.

108.38 per liter of petrol in Amravati on Saturday | अमरावती शहरात शनिवारी पेट्रोल प्रतिलिटर १०८.३८

अमरावती शहरात शनिवारी पेट्रोल प्रतिलिटर १०८.३८

Next
ठळक मुद्देआता सायकल बाहेर काढणे हाच पर्याय  पेट्रोल, गॅस दरवाढीने सामान्यांचे बजेट कोलमडलेटॅक्स कमी केल्यासच दर नियंत्रण शक्य

इंदल चव्हाण

 लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : शहरात शनिवारी पेट्रोल प्रतिलिटर १०८.३८ पैसे, तर डिझेल ९८.९४ रुपये प्रतिलिटर दराने विकण्यात आले.

सन २०१४ मध्ये शासन पेट्रोल व डिझेलवर ४० टक्के टॅक्स वसूल करीत होते. सन २०१७ मध्ये ५० टक्के आणि सद्यस्थितीत तो आकडा ६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना महामारीचा खर्च केवळ इंधन दरवाढीतूनच वसूल करण्याचा मनसुबा आखल्याचे लक्षात येऊ लागले आहे. दरवाढीचा ठिकठिकाणी धरणे, मोर्चा, आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करून केंद्र शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करीत असले तरी दरवाढीला आळा बसलेला नाही. सरकारने कर कमी केल्यास इंधन दरवाढ कमी होऊ शकेल, तोच एकमेव उपाय असल्याच्या प्रतिक्रिया पेट्रोल पंप संचालकांनी दिली.

काय म्हणतात ग्राहक?

सन २०२४ पर्यंत देशात गरिबीच राहणार नाही, असे वक्तव्य मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी केले होते. या महागाईत सन २०२४ पर्यंत देशात गरीब जिवंतच राहणार नाही, हे नक्की.

- नीलेश मोहोड, ग्राहक, व्हीएमव्ही

शाळा, महाविद्यालये घरापासून दूर असल्याने वाहनाने ये-जा करावी लागते. पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने आता सायकलीच बाहेर काढाव्या लागतील.

- ऐश्वर्या गिरी, विद्यार्थी, अर्जुननगर

पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरवाढीतून कोरोनाका‌ळातील खर्च भागविण्याचा शासनाचा प्रयत्न दिसत आहे. यातून जनसामान्यांचा विचार केला गेलेला नाही.

- श्रेयशा खासबागे, ग्राहक, अर्जुननगर

- सीईटी अंतर्गत मुलीचा एका नामांकित शाळेत नंबर लागला. परंतु, घरापासून शाळेचे अंतर अधिक आहे. वाहतूक खर्च परवडत नसल्याने तेथे प्रवेश घेतला नाही.

- सुधीर मानकर, ग्राहक, व्हीएमव्ही

चार महिन्यात अशी झाली दरवाढ

महिना पेट्रोल डिझेल गॅस सिलिंडर

एप्रिल ९८.२९ ८९.३० ८३४

मे ९९.८२ ९१.२३ ८३४

जून १०४.५३ ९६.६३ ८३४

जुलै १०८.३८ ९८.९४ ८५९.५०

Web Title: 108.38 per liter of petrol in Amravati on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.