पंढरी प्रकल्पात ११ जणांनी घेतल्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 10:44 PM2018-10-13T22:44:50+5:302018-10-13T22:45:10+5:30

तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम मार्गी लागावे आणि प्रकल्पाग्रस्तांवरील अन्याय दूर व्हावा, या मागणीसाठी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय अन्न-जलत्याग आंदोलन जलसमाधीच्या वळणावर पोहोचले. शनिवारी प्रकल्पात ११ जणांनी उड्या घेतल्या.

11 people took part in the Pandari project | पंढरी प्रकल्पात ११ जणांनी घेतल्या उड्या

पंढरी प्रकल्पात ११ जणांनी घेतल्या उड्या

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून बैठकीचे आमंत्रण : पोलिसांच्या सतर्कतेने फसला जलसमाधीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड/पुसला : तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम मार्गी लागावे आणि प्रकल्पाग्रस्तांवरील अन्याय दूर व्हावा, या मागणीसाठी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय अन्न-जलत्याग आंदोलन जलसमाधीच्या वळणावर पोहोचले. शनिवारी प्रकल्पात ११ जणांनी उड्या घेतल्या. मात्र, पोलिसांनी तातडीने हालचाली करीत त्यांना वाचविले आणि स्थानबद्ध केले. उशिरा सायंकाळी सोडण्यात आले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संपर्क करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला आमंत्रित केले.
पंढरी मध्यम प्रकल्पावर उपोषण करीत असलेले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकाही सक्षम अधिकाºयानेच नव्हे, तर आ. अनिल बोंडे यांनीही भेट घेतली नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी दुपारी १ वाजता ११ आंदोलकांनी पंढरी मध्यम प्रकल्पात उड्या घेतल्या. प्रकल्पस्थळी तैनात पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढून त्यांना ताब्यात घेऊन शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्यात आणले. विजय श्रीराव यांच्यासह शेतकरी नेते दिलीप भोयर, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर काळे, गजानन डाहाके, चंद्रशेखर ढोरे, संजय कुरवाळे, राजू ठाकरे, नाना अजमिरे, अनिल कुयटे, सूर्यभान कुयटे, नरेंद्र कुरवाळे यांचा आंदोलनात समावेश होता. ठाणेदार शेषराव नितनवरे यांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि मुंबई पोलीस कायदा ६८ नुसार कारवाई करून कलम ६९ नुसार सुटका केली. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विक्रम ठाकरे, पंचायत समिती उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे,भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अंजली तुमराम, तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, शहराध्यक्ष नरेंद्र फसाटे, छाया घ्यार, प्रकाश देशमुख, जगदीश बेलसरे, नंदू आजनकर, राष्ट्रवादीचे राजाभाऊ कुकडे आदींनी आंदोलनाला समर्थन दिले होते.
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचे आमंत्रण
आंदोलनाची दखल घेऊन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी विजय श्रीराव यांच्याशी दूरध्वनीहून संपर्क साधला आणि सर्व मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अमरावती भेटीदरम्यान चर्चेचे आमंत्रण दिले.

मुख्यमंत्र्यांसोबत अमरावती येथे रविवारी १५ जणांचे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत. पालकमंत्र्यांना तसे कळविले आहे. योग्य मोबदला आणि प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, हीच आमची मागणी राहणार आहे.
- विजय श्रीराव, माजी जिल्हा उपाध्यक्ष, भाजप

Web Title: 11 people took part in the Pandari project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.