शिक्षणाधिकाऱ्यांसह ११ शिक्षकांना ‘शो कॉज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:14 PM2018-01-30T22:14:26+5:302018-01-30T22:14:57+5:30

महापालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता माघारल्याचा ठपका ठेवत शिक्षणाधिकारी ई.झेड. खान यांच्यासह दोन मुख्याध्यापक व नऊ सहायक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

11 teachers including 'Education officials' show Cause | शिक्षणाधिकाऱ्यांसह ११ शिक्षकांना ‘शो कॉज’

शिक्षणाधिकाऱ्यांसह ११ शिक्षकांना ‘शो कॉज’

Next
ठळक मुद्देशैक्षणिक गुणवत्ता माघारल्याचा ठपका : दोघांवर निलंबनाची तलवार

आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता माघारल्याचा ठपका ठेवत शिक्षणाधिकारी ई.झेड. खान यांच्यासह दोन मुख्याध्यापक व नऊ सहायक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उपायुक्त सामान्य नरेंद्र वानखडे यांच्या स्वाक्षरीने बजावलेल्या या कारणे दाखवा नोटीसचे उत्तर शिक्षणाधिकाऱ्यांनी अद्याप दिलेले नाही. नोटीस बजावण्यात आलेले मुख्याध्यापक व सहायक शिक्षक नेहरु मैदान स्थित महापालिकेच्या हिंदी व मराठी माध्यमांच्या शाळेत कार्यरत आहेत.
प्रार्थनेच्या वेळी शाळा व वर्गात अनुपस्थित असलेल्या एका मुख्याध्यापकासह एका सहायक शिक्षकावर निलंबनाची टांगती तलवार आहे. आपणास सोपविण्यात आलेल्या कामात अक्षम्य दिरंगाई केली असून, या कामचुकारपणामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाल्याचा ठपका शिक्षणाधिकारी खान यांच्यासह या मुख्याध्यापक व सहायक शिक्षकावंवर ठेवण्यात आला आहे. आ. सुनील देशमुख यांनी १८ जानेवारी रोजी महापालिकेच्या नेहरू मैदान स्थित मराठी व हिंदी शाळांना आकस्मिक भेट दिेली होती. या भेटीचा संदर्भही या कारणे दाखवा नोटीसमध्ये देण्यात आला असून, महापालिका शाळांच्या घसरलेल्या शैक्षणिक व भौतिक गुणवत्तेच्या अनुषंगाने प्रशासन गंभीर झाले आहे. शिक्षणाधिकारी ई.झेड. खान यांच्या कार्यप्रणालीवर तर उपायुक्त वानखडे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
यांना बजावली नोटीस
शिक्षणाधिकारी ई.झेड. खान. मनपा मराठी शाळेचे मुख्याध्यापक एम.पी. सोनवणे. सहायक शिक्षक विजय खंडारे, संगीता कुबडे, वैशाली सुदामे, सारिका खांदे, वृंदा ठाकरे, मनपा हिंदी शाळेचे मुख्याध्यापक कमलाप्रसाद कुर्मी, सहायक शिक्षक उज्ज्वला काटकर, के.एस. काळे, स्वाती यादव आणि छाया जामनिक यांना नोटीस बजावली आहे.

Web Title: 11 teachers including 'Education officials' show Cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.