पश्चिम विदर्भात ११ हजार मे. टन चाऱ्याची तूट; दुष्काळाच्या झळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 05:04 PM2019-01-17T17:04:24+5:302019-01-17T17:04:46+5:30

अत्यल्प पावसामुळे पश्चिम विदर्भात २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. दुष्काळामुळे वैरणटंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे.

11,000 in the west of Vidarbha Tons of fodder; Drought | पश्चिम विदर्भात ११ हजार मे. टन चाऱ्याची तूट; दुष्काळाच्या झळा 

पश्चिम विदर्भात ११ हजार मे. टन चाऱ्याची तूट; दुष्काळाच्या झळा 

Next

- गजानन मोहोड

अमरावती : अत्यल्प पावसामुळे पश्चिम विदर्भात २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. दुष्काळामुळे वैरणटंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तांच्या माहितीनुसार विभागातील दुष्काळी भागात लहान-मोठी २५ लाख ३६ हजार पशूधन आहेत. या पशूधनाला किमान ११,०२८ मे.टन चा-याची कमी  भासणार असल्याने चा-याची तूट भरून काढायला संबंधित विभागाचे नियोजन सुरू आहे.
राज्यातील दुष्काळी गावांत पाणीटंचाईसह वैरणटंचाईची मोठी प्रमाणावर समस्या असल्याने या सर्व ठिकाणी चाºयाचे नियोजन करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या गावातच चा-याच्या उपलब्धतेसाठी नियोजन सुरू आहे. यात गाळपेर क्षेत्रात चारा निर्मिती हा पर्याय म्हणून समोर आलेला आहे. प्रकल्पाला कोरड लागल्याने यामधील पाणीसाठा कमी झालेला आहे. या बुडीत क्षेत्रातील जमिनी शेतक-यांना मका, ज्वारी, बाजरी सारखी चारा पिके घ्यायला नाममात्र एक रूपया भाडेपट्टीने शेतकºयांना देण्यात येणार आहे. विभागात ७,३६० हेक्टर गाळपेर क्षेत्रात ६३९ क्विंटल मका, ५१६ क्विंटल ज्वार, ८८ क्विंटल बाजरी व १४ क्विंटल न्यूट्रीफिड बियाण्यांची आवश्यकता आहे. यासाठी विभागात सद्यस्थितीत २,१३५ अर्ज पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झालेले आहेत. 
राज्यासाठी उपलब्ध १० कोटींमधून विभागात आरकेव्हीवाय योजनेंतर्गत ४५६ क्विंटल मका बियाणे प्राप्त आहेत. यामध्ये ४५,६४५ मे.टन हिरवी वैरण व ज्वारीसाठी ५४२ क्विंटल बियाणे प्राप्त आहेत. यामधून ६०,९९५ मे.टन हिरवे वैरण उपलब्ध होणार आहे. असे एकूण १,०६,६०० मे.टन चाºयाचे नियोजन करण्यात आले आहे. २,२७० हेक्टरमध्ये हे नियोजन आहे. यासाठी १४,४९२ अर्ज प्राप्त झाले असून,  यामधून १२,७३९ लाभार्थ्यांची निवड पशुसंवर्धन विभागाने केली आहे.

जिल्हानिहाय पशुधन, लागणारा चारा
अमरावती जिल्ह्यातील १०,०३,५५५ पशुधनाला प्रतीमाह १,०५,२४२ मे.टन चाºयाची आवशकता आहे. अकोला जिल्ह्यात ४,५२,४८८ पशुधनाला ५२,३६२ मे.टन., बुलडाणा जिल्ह्यात १०,२०,३३७ पशूधनाला १,१४,७४३ मे.टन, वाशीम जिल्ह्यात ४,५७,५२४ पशुधनाला ५३,५१० मे.टन. व यवतमाळ जिल्ह्यातील ११,४०,३३९ पशुधनाला १,४१,२७७ मे. टन चाºयाची आवश्यकता आहे.
 
अमरावती, बुलडाण्यात चा-याची तूट

 विभागातील दुष्काळी २८ तालुक्यांत २०,३५,७६४ पशुधन आहे. यासाठी जून २०१९ पर्यंत १९,४३,८८७ मे.टन चारा लागेल. मात्र, १९,५४,९१५ मे.टन चारा उपलब्ध होणार असल्याने ११,०२८ मे.टन चाºयाची तूट भासणार आहे. यामध्ये अकोला, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यात चाºयाची तूट बासणार नसली तरी अमरावती जिल्ह्यात १,००,५५६ मे.टन. व बुलडाणा जिल्ह्यात १,८३,५३० मे.टन चाºयाची तूट भासणार आहे.

Web Title: 11,000 in the west of Vidarbha Tons of fodder; Drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.