११ वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन २६ व २७ डिसेंबरला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 09:39 PM2019-12-15T21:39:14+5:302019-12-15T21:40:27+5:30
चांदूररेल्वे येथील संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात ११ वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती : वऱ्हाड विकास अमरावती, श्री. संत गाडगेबाबा विद्यालय व स्व. बापूरावजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालय मांजरखेड (कसबा) यांच्यावतीने २६ व २७ डिसेंबर रोजी मांजरखेड ता. चांदूररेल्वे येथील संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात ११ वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम पुरोगामी लेखक विचारवंत विजयकुमार लडकत (पुणे) राहतील. संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ओबीसी सेवा संघाचे कार्याध्यक्ष नरेंद्र गद्रे यांच्या हस्ते होणार आहे. पुरोगामी लेखिका शारदा गणोरकर स्वागताध्यक्षा राहतील. याप्रसंगी बहुजन नेते संतोष हुशे, प्राचार्य सुधीर महाजन, प्राचार्य मधुकर आमले, राहुल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मधुकर अभ्यंकर, विचारवंत प्राचार्य राजेंद्र हावरे, डी. बी. दुपारे, चिंतामन कांबळे, बाळाभाऊ ओइंबे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. २६ डिसेंबरला सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीतून भारताचे संविधान, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यावेळी साहित्य संमेलनाचे गुलामगिरी ग्रंथाला लोखंडी साखळीतून मुक्त करून संमेलनाचे उद्घाटन केले जाणार आहे. फुले- शाहू- आंबेडकरांच्या अनुयायांनी दोन दिवसीय बौद्धिक मंथनाचा लाभ घेण्याचे आवाहान आयोजन समितीचे अध्यक्ष बी. आय. इंगळे व संस्थापक संयोजक श्रीकृष्ण बनसोड यांनी केले आहे. यावेळी दोन परिसंवाद व दोन एकपात्री नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.