१२ दिवसांत ८ ते १४ अंशादरम्यान पारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:27+5:30

वातावरण बदलाने जिल्ह्यात शीलहरचा फटका मागच्या आठवड्यात बसला होता. या दरम्यान दोन दिवस तुरळक पावसाची नोंद काही तालुक्यांत झाली, तर मोर्शी व तिवसा तालुक्यात गारपीटही झाली. यामुळे खरिपाच्या कपाशी, तूर व रबीच्या गहू, हरभरा तसेच संत्रा पीक या वातावरण बदलाने बाधित झाले.

In 12 days, mercury varies between 8 and 18 degrees | १२ दिवसांत ८ ते १४ अंशादरम्यान पारा

१२ दिवसांत ८ ते १४ अंशादरम्यान पारा

googlenewsNext
ठळक मुद्देहवामानतज्ज्ञ : कमाल तापमानात अंशत: वाढ अपेक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मागील १२ दिवसांत जिल्ह्याचे तापमान ८ ते १४ अंशाचे दरम्यान राहिले आहे. पुढील ७२ तासात जिल्ह्याचे तापमानात अंशत: वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये कमाल तापमान हे १२ अंशाच्या आसपास राहणार असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.
वातावरण बदलाने जिल्ह्यात शीलहरचा फटका मागच्या आठवड्यात बसला होता. या दरम्यान दोन दिवस तुरळक पावसाची नोंद काही तालुक्यांत झाली, तर मोर्शी व तिवसा तालुक्यात गारपीटही झाली. यामुळे खरिपाच्या कपाशी, तूर व रबीच्या गहू, हरभरा तसेच संत्रा पीक या वातावरण बदलाने बाधित झाले. गारपीटने झालेल्या नुकसानाचे दोन दिवसांत सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आहे.
शीतलहरीमुळे तूर पिकावर दवाळ गेला. यामुळे झाडे जागीच करपायला लागली आहेत तसेच ‘कोल्डवेव्ह’मुळे तुरीच्या झाडाचे शेंडे व काही ठिकाणी झाडेदेखील वाळायला लागली आहे. जमिनीत आर्द्रता व वातावरणात आर्द्रता तसेच ढगाळ वातावरण यामुळे कपाशीचे बोंडे सडायला लागली आहेत. काही ठिकाणी फुटलेला कापूस बोंडात ओला झालेला आहे. यामुळे कापसाची प्रतवारीदेखील खराब झालेली आहे.
संत्र्याच्या आंबिया बहराला ताण बसला नसल्यामुळे येणाऱ्या बहरावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. वातावरण बदलामुळे सर्दी, पडसे, खोकला व ताप यासारख्या आजारांतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नागरिकांनी आजारावर मात केल्यास या हवामानाचा आनंद लुटता येईल.

जिल्ह्यातील तापमान स्थिती (अं/से)
दिनांक कमाल किमान
१ जानेवारी १२.४ २५.६
२ जानेवारी १४.१ २०.००
३ जानेवारी १४.१ २०.००
४ जानेवारी १२.४ २५.००
५ जानेवारी ०९.२ २३.००
६ जानेवारी १२.४ २६.००
७ जानेवारी १३.०० २६.००
७ जानेवारी १४.३ २६.००
८ जनेवारी १४.३ २६.००
९ जनेवारी १४.१ २६.००
१० जानेवारी ०९.३ २६.००
११ जानेवारी ०९.१ २६.००
१२ जानेवारी ०८.२ २६.००

Web Title: In 12 days, mercury varies between 8 and 18 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natureनिसर्ग