तीन लाख रक्तनमुन्यांत १२ रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:12 AM2021-04-25T04:12:28+5:302021-04-25T04:12:28+5:30
हिवताप दूषित रुग्णसंख्येत दरवर्षी घट झाली, हे आरोग्य यंत्रणेचे सातत्य सिद्ध करणारे आहे. हिवताप आजार प्लाझ्मोडीयम या परोपजिवी जंतुमुळे ...
हिवताप दूषित रुग्णसंख्येत दरवर्षी घट झाली, हे आरोग्य यंत्रणेचे सातत्य सिद्ध करणारे आहे. हिवताप आजार प्लाझ्मोडीयम या परोपजिवी जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार ॲनाफिलिप्स या मादी डासांच्या डंख मारल्यामुळे होतो. यावर उपया म्हणून जिल्हा हिवताप विभागातर्फे कार्यवाही केली जाते. हिवताप कर्मचाऱ्यांद्वारा गृहभेटी, सर्वेक्षण, डासअळी घणतेत वाढ होणार नाही, याची दक्षता व पडताळणी करून वेळीच उपाययोजना केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हास्तरावरून औषधी साठा उपलब्ध करून घेणे, गावागावांत साठविलेल्या पाणीसाठ्या टेमिफॉस द्रावण सोडणे, गप्पी मासे सोडून डबक्यातील डास उत्पत्ती थांबविणे आदी कामे केली जातात.
बॉक्स
वर्षे रक्त नमुने पॉझिटिव्ह
२०१६ ५२३११२ २६०
२०१७ ४८३२४९ २४६
२०१८ ४७०४६० ५२
२०१९ ४५०८९३ ३१
२०२० २९९७०८ १२