१२ आमदारांची सार्वजनिक उपक्रम समिती दौऱ्यावर

By admin | Published: February 22, 2016 12:49 AM2016-02-22T00:49:12+5:302016-02-22T00:49:12+5:30

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय सार्वजनिक उपक्रम समितीचा २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा दौरा निश्चित झाला आहे.

12 public meetings of MLAs on tour | १२ आमदारांची सार्वजनिक उपक्रम समिती दौऱ्यावर

१२ आमदारांची सार्वजनिक उपक्रम समिती दौऱ्यावर

Next

विधिमंडळ सचिवालय : विविध ठिकाणी भेटी
अमरावती : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय सार्वजनिक उपक्रम समितीचा २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा दौरा निश्चित झाला आहे. या समितीत एकूण १२ आमदारांचा समावेश आहे.
सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख म्हणून आमदार सुनिल देशमुख हे असुन त्यांच्यासह बारा आमदारांमध्ये अशोक उईके राळेगाव, आ.भीमराव धोंडे आष्टी बीड, आ.आशिष देशमुख काटोल, आ.आकाश पुंडकर खामगाव, आ.द्वारम मल्लीकार्जुन रेड्डी रामटेक, आ.अब्दुल सत्तार अब्दुल नबी सिल्लोड, यशोमती ठाकूर तिवसा, आ. हनुमंत डोळस माळशिरस, आ.जितेंद्र ठाकूर वसई, आ. बळीराम शिरसकर बाळापूर, आ.अनिल परब वांद्रे आ.अनंत गाडगे आदी आमदारांचा समावेश आहे. याशिवाय तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य अभियंता, एमआयडीसी, एमटीडीसी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. सामेवार २२ फेब्रुवारी, रोजी मुंबई येथून अमरावती रेल्वे स्थानकावर आगमन. सकाळी ८.२० वाजता शासकीय विश्रामगृह आगमन व राखीव. सकाळी ९०.३० वाजता बेलोरा विमानतळकडे प्रयाण. बेलोरा विमानतळ आगमन व विमानतळाची पाहणी. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. सकाळी ११.३० वाजता चिखलदराकडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता चिखलदरा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) यांच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा व पर्यटन स्थळाची पाहणी करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 12 public meetings of MLAs on tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.