रेमेडिसिविरचे १२ हजार युनिट उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:12 AM2021-04-09T04:12:58+5:302021-04-09T04:12:58+5:30

अमरावती : कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी आवश्यक रेमडिसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनची अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत पुरेशी उपलब्धता असल्याचे अन्न व औषधे ...

12,000 units of Remedicivir available | रेमेडिसिविरचे १२ हजार युनिट उपलब्ध

रेमेडिसिविरचे १२ हजार युनिट उपलब्ध

Next

अमरावती : कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी आवश्यक रेमडिसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनची अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत पुरेशी उपलब्धता असल्याचे अन्न व औषधे प्रशासन सहआयुक्त वि. द. सुलोचने यांनी बुधवारी सांगितले.

अमरावती जिल्ह्यात रेमडिसिविर इंजेक्शनचे १२ हजार १८६ युनिट्स व ८.३७ वायू उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यासाठी रेमडिसिविर इंजेक्शनचे ८४६ युनिट्स व ११.०९ मे. टन प्राणवायू उपलब्ध आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी रेमडिसिविर इंजेक्शनचे ३ हजार ३३८ युनिट्स व ८.९ मे. टन प्राणवायू उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार आणखी औषधे उपलब्ध होणार असल्याचे सुलोचने यांनी सांगितले. सर्व ठिकाणी सामग्री उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अडचणीच्या वेळी प्रशासनाशी संपर्क साधावा. भविष्यात गरज लक्षात घेऊन आणखी सामग्री उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: 12,000 units of Remedicivir available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.