१२५ कोटींचे स्वच्छता कंत्राट : घोडे गंगेत न्हाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:30 PM2018-08-25T22:30:42+5:302018-08-25T22:31:23+5:30

बहुप्रतीक्षित स्वच्छता कंत्राटाच्या निविदाप्रक्रियेला शनिवारी सुरुवात करण्यात आली. दीड वर्षांपासून सत्ताधीशांच्या मनमर्जीत अडकलेल्या या स्वच्छता कंत्राटाकडे धुरिणांचे लक्ष लागले होते. निविदा जाहीर झाल्याने प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला आहे.

125 crore sanitation contract: Horses! | १२५ कोटींचे स्वच्छता कंत्राट : घोडे गंगेत न्हाले!

१२५ कोटींचे स्वच्छता कंत्राट : घोडे गंगेत न्हाले!

Next
ठळक मुद्देनिविदा प्रक्रियेस सुरुवात : पाच वर्षांचा कालावधी; काही प्रभाग गटांकरिता राखीव, वार्षिक २५ कोटी होणार खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुप्रतीक्षित स्वच्छता कंत्राटाच्या निविदाप्रक्रियेला शनिवारी सुरुवात करण्यात आली. दीड वर्षांपासून सत्ताधीशांच्या मनमर्जीत अडकलेल्या या स्वच्छता कंत्राटाकडे धुरिणांचे लक्ष लागले होते. निविदा जाहीर झाल्याने प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला आहे.
महापालिका क्षेत्रातील २२ प्रभागांसाठी प्रभागनिहाय निविदा मागविण्यात आल्या आहेत. सोबतच इतवारा बाजार, ट्रान्सपोर्टनगर व सोमवार बाजारासाठीही एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. राजापेठ, नवीवस्ती व एसआरपीएफ वडाळी हे तीन प्रभाग महिला बचतगटांकरिता, तर गडगडेश्वर व मोरबाग-विलासनगर हे प्रभाग सफाई कामगारांच्या समाजाकरिता राखीव आहेत. दररोज ५५ कामगारांचा समावेश असलेले हे कंत्राट तीन अधिक दोन अशा पाच वर्षांसाठी असेल. त्यासोबतच वाढत्या खर्चावर नियंत्रण राखण्यासाठी दैनंदिन आठऐवजी पाच तास कंत्राटदाराच्या कामगारांना काम करावे लागेल. कामगार कार्यालयाने ठरविल्यानुसार त्यांना पाच तासांचा मोबदला मिळेल. २२ आणि बाजारांसाठी एक अशा २३ कंत्राटांसाठी निविदा २५ आॅगस्टला सकाळी ११ पासून डाऊनलोड करता येतील. १२ सप्टेंबरला निविदा उघडण्याचा कार्यक्रम महापालिकेने निश्चित केला आहे. दैनंदिन स्वच्छतेच्या या पाच वर्षीय कंत्राटाची एकूण किंमत १२५ कोटींच्या आसपास आहे. पूर्वी ३८ ते ४० कोटींऐवजी वार्षिक २५ कोटींचा खर्च या कंत्राटावर अपेक्षित आहे. निविदाप्रक्रियेने २०१५-१६ पासून सुरू असलेला वितंडवाद आणि राजकारण संपुष्टात आले आहे.
असे आहे कामाचे स्वरूप
प्रभागातील रहिवासी, व्यावसायिक, विविध संस्था, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी सर्व प्रकारचा ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे. सर्व रस्ते, लहान-मोठ्या कच्च्या व पक्क्या नाल्या, सर्व्हिस गल्ल्या, सार्वजनिक संडास, मुताऱ्या, कल्व्हर्ट रोड, क्रॉस ड्रेन साफ करणे. रस्त्याच्या आजूबाजूचे व नालीवरील गवत काढणे. फुटपाथवरील कचरा, मनपा मुख्यालय-दवाखाने, व्यावसायिक परिसर साफ करणे. पावसाळापूर्व नाली/नाल्या साफ करणे. फवारणी व धूरळणी.
१३२ मिनी टिप्पर
कंत्राटदाराला प्रत्येक प्रभागात सहा मिनी टिप्पर ठेवावे लागणार आहेत. ते कंत्राटदाराला खरेदी करावे लागतील. याशिवाय मनपाकडे असलेले तीनचाकी आॅटोरिक्षा प्रत्येक प्रभागातील तीन याप्रमाणे पुरविले जातील. प्रत्येक प्रभागात पाच फॉगिंग मशीन, प्रत्येकी दोन ग्रास कटर, प्रत्येकी पाच स्प्रेइंग पंप, प्रत्येकी १० हातगाडी व प्रत्येकी एक बायोमेट्रिक मशीन राहणार आहे. कंत्राटदाराला ही सर्व खरेदी करायची आहे.
५५ कामगार, ५ तास
नव्या कंत्राटानुसार प्रत्येक प्रभागात ५५ कामगार राहणार आहेत. त्यातील १२ कामगार वाहनावर, तीनचाकी आॅटोवर सहा कामगार व स्वच्छतेसाठी ३७ कामगार राहतील. हे कंत्राट दररोज पाच तासांसाठी असेल. अर्थात कंत्राटदाराच्या कामगारांना पाच तास काम करावे लागेल.

Web Title: 125 crore sanitation contract: Horses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.