धूळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा महिन्यांत १२६ सुखरूप प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:20+5:302021-01-14T04:11:20+5:30

आरोग्य विभाग : संस्थात्मक प्रसूतीत गाठला उच्चांक अमरावती-धारणी : धारणी तालुक्यातील दुर्गम भागातील धूळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्राने गत ...

126 safe deliveries in six months at Dhulghat Railway Primary Health Center | धूळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा महिन्यांत १२६ सुखरूप प्रसूती

धूळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा महिन्यांत १२६ सुखरूप प्रसूती

Next

आरोग्य विभाग : संस्थात्मक प्रसूतीत गाठला उच्चांक

अमरावती-धारणी : धारणी तालुक्यातील दुर्गम भागातील धूळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्राने गत सहा महिन्यात १२६ मातांची सुखरूप प्रसूती करून संस्थात्मक प्रसूतीत जिल्ह्यात उच्चांक गाठला आहे. कोरोनाची साथ असतानाही जिवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांनी निरंतर आपले कर्तव्य बजावले. त्याची ही फलश्रुती असल्याची प्रतिक्रिया यानिमित्त व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद मुख्यालयापासून २१० कि.मी. अंतरावर दुर्गम भागात असणारे धूळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राची लोकसंख्या २२ हजार, तर धूळघाटची लोकसंख्या केवळ दोन हजार आहे. परिसरातील गोरगरीब व आदिवासी बांधव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवेचा लाभ घेत असतात. एप्रिल २०२० ते अद्यापपर्यंत १२६ प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रसूती कक्षामध्ये सुखरूप झालेल्या आहेत. गत परिस्थिती पाहता, जेथे किमान सात टक्केच प्रसूती संस्थेमध्ये होत होत्या. त्या आज ७२ टक्केच्या वर पोहोचल्या आहेत. धूळघाट येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळातही आरोग्यसेवा कुठेही विस्कळीत होऊ न देता आपले कर्तव्य बजावले. त्यातून संस्थात्मक प्रसुतीच्या प्रमाणात वाढ झाली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डॉ. गोविंद राठोड, डॉ. समाधान डुकरे, आरोग्य सेविका प्रमिला जावरकर, कविता धुर्वे, जी.एन.एम. मयूरी कासदेकर, विजया भिलावेकर यांनी याकरिता परिश्रम घेतले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (मेळघाट क्षेत्र) डॉ. अभिलाष पांडे तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे , डॉ. दीपक चऱ्हाटे, कविता पवार आदींचे याकरिता मार्गदर्शन लाभले.

बॉक्स

भूमकाकडे न जाता संस्थात्मक प्रसूतीत वाढ

प्रत्येक प्रसूत महिलेला बाळाकरिता हायपोथर्मिया किट, तीन दिवस आवश्यक औषधोपचार आहार व उपस्थित कर्मचाऱ्यांचा कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मनमिळावू स्वभाव या सगळ्या सुविधांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दल लाभार्थींमध्ये विश्वास निर्माण झाला. मेळघाटातील नागरिकांनी भूमकाकडे न जाता संस्थात्मक प्रसूतीत वाढ होण्यासाठी सतत प्रयत्न होत असल्याने धूळघाटचे हे यश आहे.

Web Title: 126 safe deliveries in six months at Dhulghat Railway Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.