अमरावती पदवीधरमध्ये १३ उमेदवार बाद, महाआघाडीच्या उमेदवाराची विजयाकडे घोडदौड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 10:18 AM2023-02-03T10:18:12+5:302023-02-03T10:18:35+5:30
रात्री दोननंतर बाद फेरीला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी नऊपर्यंत बारा उमेदवार बाद होऊन त्यांच्या मतपत्रिकेवरील पहिल्या क्रमांकाची मते अन्य उमेदवाराला देण्याचा प्रक्रिया सुरू आहे.
अमरावती :
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अवैध मतांच्या फेरमोजणीनंतर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना 43517 व भाजपचे डॉक्टर रणजीत पाटील यांना 41171 मते राहिली. यामध्ये 94200 मते वैध व 8387 मते पवई ठरली. त्यामुळे विजयी मताचा कोटा 47101 असा निश्चित झाला.
रात्री दोननंतर बाद फेरीला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी नऊपर्यंत बारा उमेदवार बाद होऊन त्यांच्या मतपत्रिकेवरील पहिल्या क्रमांकाची मते अन्य उमेदवाराला देण्याचा प्रक्रिया सुरू आहे. प्रत्यक्षात प्रशासनाचे नियोजन नसल्यामुळे मतमोजणीला आणखी उशीर लागत आहे. सद्यस्थितीत धीरज लिंगाडे यांना विजयी मताचा कोटा पूर्ण करण्यास 3584 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती येण्यास दुपारचे दोन वाजण्याची शक्यता आहे.