शहर पोलिसांवर हल्ल्याच्या वर्षभरात १३ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:12 AM2021-02-08T04:12:53+5:302021-02-08T04:12:53+5:30

अमरावती/ संदीप मानकर शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी तसेच नागरिकांनी सुरक्षित राहावे, यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस डोळ्यांत तेल ...

13 incidents of attacks on city police during the year | शहर पोलिसांवर हल्ल्याच्या वर्षभरात १३ घटना

शहर पोलिसांवर हल्ल्याच्या वर्षभरात १३ घटना

Next

अमरावती/ संदीप मानकर

शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी तसेच नागरिकांनी सुरक्षित राहावे, यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून आपले कर्तव्य बजावत असतात. पण, त्यांना कर्तव्य बजावताना नागरिकांकडून किंवा सराईत आरोपींकडून त्यांच्यावर धक्काबुक्की किंवा मारहाण केल्याच्या घटना अलीकडे पुढे आल्या आहेत.

शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या शहर हद्दीत गत वर्षात १३ घटना पुढे आल्या आहेत. यामध्ये १७ आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५३ व इतर कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला. १३ गुन्हेसुद्धा उघड असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

पोलिसांप्रमाणे महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावरसुद्धा हल्ला केल्याच्या चार घटना घडल्या आहेत. यामध्ये सहा आरोपींचा समावेश आहे. धक्काबुक्कीच्या घटना जरी घडल्या असल्याने तरी गंभीर स्वरूपाची दुखापत किंवा कुणालाही अपंगत्व आले नाही, हे विशेष!

बॉक्स:

२८ जणांवर कारवाई

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यांना धक्काबुक्की तथा मारहाण केल्याच्या १३ घटना शहर पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत घडल्या आहेत तसेच महसूल विभागात चार व महावितरण तसेच इतर विभागात आठ घटना पुढे आल्या आहेत. एकूण २८ आरोपींवर गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये अनेकांना अटकही करण्यात आली आहे.

बॉक्स:

महसूल विभागाला केले टार्गेट

पोलिसांप्रमाणे सर्वाधिक काम नागरिकांना महसूल विभागात पडते. अधिकाऱ्यांनी काम करण्यात विलंब केला, तर नागरिकांच्यावतीने त्यांना धक्काबुक्की किंवा शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हल्ल्याच्या आठ घटना घडल्या. यामध्ये पाच आरोपींचा समावेश आहे.

तीन कार्यालयात सर्वाधिक हल्ले

पोलीस विभाग - १३

महसूल विभाग - ४

इतर विभाग - ८

Web Title: 13 incidents of attacks on city police during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.