सुपर स्पेशालिटीत १३ किडनी ट्रान्सप्लांटेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:16 AM2021-08-13T04:16:59+5:302021-08-13T04:16:59+5:30
अमरावती शहरात आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा प्राप्त होत असून, मोठी शस्त्रक्रियादेखील आता येथीलच डॉक्टरांच्या साह्याने होऊ लागल्या आहेत. त्यामुळे नागपूर, ...
अमरावती शहरात आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा प्राप्त होत असून, मोठी शस्त्रक्रियादेखील आता येथीलच डॉक्टरांच्या साह्याने होऊ लागल्या आहेत. त्यामुळे नागपूर, मुंबई, हैदराबाद येथे जाण्याचा रुग्णांचा वेळ व त्रास वाचत असून, योग्य शस्त्रक्रियेच्या माध्यमातून आतापर्यंत १३ जणांना किडनी ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून जीवदान मिळाल्याची माहिती सुपर स्पेशालिटीचे अधीक्षक तुळशीदास भिलावेकर यांनी दिली.
बॉक्स
आठ ब्रेनडेथ पासून ३९ जणांना जीवदान
शहरातील आठ जणांचे मस्तिष्क मृत झाल्यानंतर त्यांच्या अन्य अवयवापासून गरजूंना त्याचा लाभ मिळविण्याविषयी नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यातील आठही ब्रेनडेथ व्यक्तींच्या शरीरातील इतर अवयव काढून गरजवंत ३९ व्यक्तींना ट्रान्सप्लाट करून जीवदान दिल्याचे महान कार्य येथील डॉक्टरांनी केल्याची माहिती डॉ. सतीश वडनेरकर यांनी दिली.
बॉक्स
१३ किडनीदात्यांचे योगदान
येथील सुपरस्पेशालिटी हस्पिटलमध्ये १३ जणांना किडनी दान करण्यात आले. यामध्ये ६ माता, तीन पत्नी, एक भाऊ, तीन वडिलांचा समावेश आहे.
---
येथे झाले किडनी प्रत्यारोपण
डॉ. अविनाश चौधरी यांच्या हस्पिटलमध्ये ३,रेडिएंट हॉस्पिटलमध्ये २, झेनिथ हॉस्पिटलमध्ये १ आणि परतवाडा येथील डॉ. भंसाली हॉस्पिटलमध्ये २, पाच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
कोट
सुपर स्पेशालिटीत ४ सर्जन, २ मेट्रोलॉजीस्ट, भूलतज्ज्ञ व अन्य स्टाफ उपलब्ध असून, नागपूर येथील युरोलॉजिस्ट डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात येथे बहुतांश शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. सध्या कोरोनामुळे बहुतांश शस्त्रक्रिया वेटिंगवर आहेत.
- डॉ. तुळशीदास भिलावेकर, अधीक्षक, सुपर स्पेशालिटी