१३० कोटीच्या नियोजनावर १० मिनिटात शिक्कामाेर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:27+5:302021-01-21T04:13:27+5:30

जिल्हा परिषद विशेष सभेत बहुमताने प्रस्ताव पारित (फोटो मेलवर झेडपी सभा नावाने आहे) अमरावती ; जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण ...

130 crore plan in 10 minutes | १३० कोटीच्या नियोजनावर १० मिनिटात शिक्कामाेर्तब

१३० कोटीच्या नियोजनावर १० मिनिटात शिक्कामाेर्तब

Next

जिल्हा परिषद विशेष सभेत बहुमताने प्रस्ताव पारित

(फोटो मेलवर झेडपी सभा नावाने आहे)

अमरावती ; जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सुमारे १३० कोटी रुपयाच्या जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या प्रस्तावास १० मिनिटात बहुमताने शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे नेहमी आतापर्यंत निधीच्या मुद्यावर होणारी ओरड न होता समन्वय ठेवून विकास कामे व निधीच्या वितरणाच्या नियोजनावर झाल्याचे विशेष सभेतील वातावरणावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेला दरवर्षी विविध विकास कामासाठी तसेच शासकीय योजनांकरिता जिल्हा नियोजन समितीकडून कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील विकास कामाचे नियोजन करण्यासाठी झेडपी प्रशासनाने पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार बुधवार २० जानेवारी रोजी झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत १०६ कोटी ७५ लक्ष १८ हजार रुपयाचा विकास आराखड्याचा प्रस्ताव सभेच्या पटलावर ठेवला होता. यामध्ये जनसुविधा योजनेसाठी ४ कोटी ५१ लाख, आयुर्वेदिक दवाखान्याचे बांधकाम ५२.५८ लाख, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम ३ कोटी १६ लाख, उपकेंद्र बांधकाम ४ कोटी ७४ लाख, अंगणवाडी बांधकाम ४ कोटी ९६ लाख, महिला व बालकल्याणच्या योजनेकरिता ८२ लाख, कोल्हापुरी बंधाऱ्याकरिता ४ कोटी २० लाख, औषधी पुरवठ्याकरिता ६० लाख, शाळा दुरुस्ती १३५७.३५ लाख तर शाळा बांधकामाकरिता १३४३.२५ लाख रुपयांचे नियोजन केले आहे. तीर्थक्षेत्र विकासाकरिता ७ कोटी ७५ लाख, ग्रामीण रस्ते २६ कोटी तर इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यासाठी १८ कोटी आणि आदिवासी उपयोजनेंतर्गत ४ कोटी ५० लाख असे एकूण १०६ कोटी ७५ लाख रुपयाच्या नियोजनावर विशेष सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त महिला व बालकल्याण, आरोग्य विभागासाठी अतिरक्त प्रत्येकी ८ कोटी व रस्ते विकासाकरिता ५ कोटी मिळून १३० कोटी रुपयाच्या नियोजनाच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान केली आहे. यावेळी सभेला अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, पूजा आमले, सदस्य प्रताप अभ्यंकर, रवींद्र मुंदे, महेंद्रसिंग गैलवार, जयंत देशमुख, नितीन गोंडाणे, सुनील डिके, सुहासिनी ढेपे, पूजा हाडोळे, वासंती मंगरोळे, सुरेश निमकर, प्रकाश साबळे यांच्यासह सीईओ तुकाराम टेकाळे, कॅफो चंद्रशेखर खंडारे व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

बॉक्स

ऑफलाईन सभेला लक्षणीय उपस्थिती

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जिल्हा परिषदेची आमसभा,विषय समितीच्या सभा ऑनलाईन पार पडल्या.मात्र आता कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आठ महिन्यानंतर २० जानेवारी रोजी पार पडलेली विशेष सभा फिजिकल डिस्टन्सिंग पाळून घेण्यात आली.या सभेला सर्वच सदस्यांनी हजेरी लावली.

बॉक्स

प्रियंका दगडकर यांना श्रद्धांजली

जिल्हा परिषद बांधकाम व शिक्षण विषय समितीच्या सभापती प्रियंका दगडकर यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. त्यामुळे झेडपी विशेष सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी शोक प्रस्ताव मांडला. यावेळी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी यांची दोन मिनिट मौन पाळून दगडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: 130 crore plan in 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.