‘त्या’ काेविड रुग्णांना परत मिळणार १.३० कोटी, खासगी हॉस्पिटलला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 05:00 AM2021-06-04T05:00:00+5:302021-06-04T05:00:31+5:30
गतवर्षी मार्च ते सप्टेंबर दरम्यान शहरातील ८ खासगी कोविड रुग्णालयात अव्वाच्या सव्वा देयके आकारल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे प्राप्त झाली होती. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेत पथक गठित केले होते. या पथकाने अमरावती शहरातील ८ खासगी काेविड हाॅस्पिटलची झाडाझडती घेतली. रुग्णांवर आकारण्यात आलेले देयके आणि शासनाने निश्चित केलेले दर या मोठी तफावत या पथकाला आढळून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोविड रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी अव्वाच्या सव्वा देयके आकारली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑडिट पथकाने अहवाल सादर केला असून, शहरातील आठ रुग्णालयांकडृून १ कोटी ३० लाख रुपये रुग्णांना परत करण्याचा निर्णय झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. येत्या दोन दिवसात जिल्हाधिकारी याविषयी शिक्कामोर्तब करतील, हे विशेष.
गतवर्षी मार्च ते सप्टेंबर दरम्यान शहरातील ८ खासगी कोविड रुग्णालयात अव्वाच्या सव्वा देयके आकारल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे प्राप्त झाली होती. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेत पथक गठित केले होते. या पथकाने अमरावती शहरातील ८ खासगी काेविड हाॅस्पिटलची झाडाझडती घेतली. रुग्णांवर आकारण्यात आलेले देयके आणि शासनाने निश्चित केलेले दर या मोठी तफावत या पथकाला आढळून आली. त्यामुळे कोणत्या रुग्णांकडून अतिरिक्त वैद्यकीय देयके वसूल करण्यात आली. याची यादी तार करण्यात आली आहे. आठ खासगी कोविड रुग्णालयांकडून १ कोटी ३० लाख वसूल करून ते रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना परत केले जाणार आहे. विभागीय आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते रुग्णांना ही रक्कम परत मिळेल, अशी माहिती आहे. येथील पारश्री हॉस्पिटलवर १ लाख तर, आराेग्यमवर ७५ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
खासगी कोविड हॉस्पिटलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या खासगी कोविड हॉस्पिटलच्या कारभार पुन्हा प्रश्नचिन्ह उद्भवत आहे. गेल्या काही महिन्यांपासून खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारींना महसूल विभागाने अतिरिक्त देयके डॉक्टरांकडून वसूल करण्याची भूमिका घेतल्याने नातेवाईकांच्या तक्रारी सत्य असल्याचे पुढे आले आहे.
खासगी कोविड रुग्णालयात अतिरिक्त देयके घेतल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी नेमली होती. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून येत्या दोन दिवसांत कारवाईची दिशा निश्चित केली जाईल. संबंधित रुग्णालयाकडून ती रक्कम वसुल केली जाईल.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी