खरवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:30+5:302021-04-15T04:12:30+5:30
शंतनू देशमुख तळवेल 14/ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 जयंती साजरी केल्या जात आहे परंतु कोरोना ...
शंतनू देशमुख तळवेल 14/
आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 जयंती साजरी केल्या जात आहे परंतु कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असल्याने खरवाडी येथील पंचशील युवक मंडळ यांच्या वतीने यावर्षी अगदी थोडक्यात साजरी करण्यात आली. यावेळेस प्रथम सकाळी साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून धम्म वंदना देण्यात आली.
------------
अंजनसि़गी येथे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
अंजन्सिंगी लोकमत न्यूज नेटवर्क आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभर साजरी केली जात आहे येथील लुम्बिनी बुद्ध विहार जतवन विहार ग्रामपंचायत मध्ये कोरोना काळात शारीरिक अंतर ठेवून व शासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून जयंती साजरी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली लुंबिनी विहारातील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण अशोक काळे यांनी केले जेतवन बुद्धविहारतील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच सौ रुपाली गायकवाड यांनी केले या कार्यक्रमाचे संचालन सौ पपिता मनोहरे यांनी केले तसेच ग्रामपंचायत कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली
Attachments area
बाबासाहेबांचे जीवन चारित्र्य खरोखरच प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात उतरवण्याची आजच्या काळाची गरज आहे. दरवर्षी सर्वत्र बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते परंतु मागील वर्षी पासून कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातल्याने प्रशासकीय आदेशांचे पालन करीत खरवाडी येथील पंचशील युवक मंडळांनी यावर्षी भारताच्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वावी जयंती प्रशासकीय नियमांचे पालन करीत अगदी थोडक्यात साजरी करायची असे ठरवून सकाळी 9 वाजता प्रतिमेचे पूजन व हारअर्पण करून त्यांना धम्म वंदना देण्यात आली यावेळेस पंचशील युवक मंडळाचे अध्यक्ष विशाल वाकोडे उपाध्यक्ष वैभव नावये कोषाध्यक्ष रमण भोवते तसेच प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रीतिश तंतरपाळे, प्रतीक इंगळे, रोशन इंगळे, रोशन वासनिक, राहुल शिंगाडे, अष्टमेश तायडे, धीरज वासनिक, अंकुश खंडारे, व इतर पंचशील युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जनतेला बाबासाहेबांची जयंती यावर्षी covid-19 चा फैलाव सर्वत्र वाढत असल्याने अगदी थोडक्यात करावी असे जनतेला आवाहन करण्यात आले होते याच आवाहनाला पाठिंबा देत खरवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून खरवाडी ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य पोलीस पाटील सुजाता महिला मंडळ व गावकऱ्यांची उपस्थिती होती.