१३८ ग्रामपंचायतींमध्ये 'महिलाराज'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:30 PM2017-10-18T23:30:28+5:302017-10-18T23:30:38+5:30
जिल्ह्यात नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाºया २५५ ग्रामपंचायतींची मतमोजणी मंगळवारी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाºया २५५ ग्रामपंचायतींची मतमोजणी मंगळवारी झाली. १३८ ग्रामपंचायतींमध्ये महिलांना प्रथमच थेट सरपंच होण्याचा बहुमान मिळाला. शासनाने थेट सरपंचांंना व्यापक अधिकार दिल्याने आता बहुमत नसले तरी या महिला सरपंचांना विनाअडसर गावाचा विकास साधता येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव आहेत. महिला सबलीकरणासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. त्यानुसार २५५ ग्रा.पं.मध्ये निवडणुकीनंतर 'महिलाराज' अस्तित्वात आले आहे. अनुसूचित जातीमधील २२, अनुसूचित जमातीमधील ३६, नागरिकांचा मागास प्रवर्गामधील ३१, तर सर्वसाधारण प्रवर्गातून ४९ महिला सरपंचपदी निवडून आल्या आहेत. अमरावती तालुक्यात १२ पैकी ८, भातकुली तालुक्यात १२ पैकी ७, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १७ पैकी ९, धामणगाव रेल्वे तालुक्यात ७ पैकी ६ चांदूर रेल्वे तालुक्यात १७ पैकी ८, चांदूर बाजार तालुक्यात २५ पैकी १४, तिवसा तालुक्यात १२ पैकी ७, मोर्शी तालुक्यात २४ पैकी ११, अंजनगाव सुर्जी तालुक्यात १३ पैकी ६, वरूड तालुक्यात २३ पैकी १२, दर्यापूर तालुक्यात २४ पैकी १३, अचलपूर तालुक्यात २३ पैकी १३, चिखलदरा तालुका २९ पैकी १४ व धारणीत १७ पैकी १० ग्रा.पं.मध्ये महिलाराज अस्तित्वात आले आहे.