अमरावती जिल्ह्यात १३८३ कंत्राटी कर्मचारी कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:12+5:302021-09-15T04:17:12+5:30
अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोनाकाळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता निधीच्या कमतरतेचे कारण ...
अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोनाकाळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता निधीच्या कमतरतेचे कारण देत या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.
डॉक्टर - ११७
नर्स - ५२७
शिपाई - ५२०
तंत्रज्ञ - १४
रुग्णवाहिका चालक - ०८
कमी केलेले एकूण कर्मचारी - १३८३
हे कर्मचारी कमी केल्यामुळे रुग्णसेवेवर काय परिणाम झाला?-काहीच नाही
5) कमी केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याचा कोट
कोरोना काळात अल्प मानधनावर आमचेकडून आरोग्य कार्य करून घेतले.मात्र कोरोना ओसरल्यानंतर गुळावरून माशी हाकलावी तसा आमच्याशी व्यवहार करण्यात आला.
एक कर्मचारी
६) कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी -
गेले २ महिने वेतनच मिळाले नाही.
रोजगार हिरावल्याने बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
/////////
कोट
शासनाचे सूचनेनुसार १० सप्टेबर २०२१ पर्यंत एकूण १३८३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामावरून कमी करण्यात आले आहे. त्याचा रुग्णसेवेवर फारसा परिणाम झालेला नाही.
- डॉ. दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती