स्थलांतरित होऊन आले १३९ शाळाबाह्य विद्यार्थी; शिक्षण विभागाचे सर्वेक्षण
By जितेंद्र दखने | Published: December 27, 2022 09:16 PM2022-12-27T21:16:03+5:302022-12-27T21:16:30+5:30
७५ मुले आणि ६४ मुलींचा समावेश
अमरावती : कोरोनानंतर जीवनशैलीत झालेल्या बदलांबरोबर शाळाबाहा विद्यार्थ्यांच्या शोधमोहिमेत अनेक बदल करावे लागले आहेत. दरवर्षी केवळ शाळाबाह्य विद्याथ्यार्चा शोध घ्यावा लागत होता. या वर्षी यामध्ये अनियमित तसेच स्थलांतरित यांसह शाळाबाह्य विद्याथ्यार्चे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत शहर व ग्रामीण भागांत विविध ठिकाणी शिक्षक, बालरक्षक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२२ या कालावधीत १३९ बालके स्थलांतरित होऊन जिल्ह्यात आल्याचे समोर आले; तर ४१६ बालके स्थलांतरित होऊन जिल्ह्याबाहेर गेल्याचे समोर आले आहे. अनियमित, स्थलांतरित व शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या बालकांना परिसरातील जवळच्या शाळेत प्रवेशित केले आहे. कोविड १९ संसर्गाच्या कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झालेले असून ६ ते १८ वयोगटातील बालके शाळाबाह्य झाल्याची बाब समोर आल्यानंतर अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही शोधमोहीम व हाती घेण्यात आली आहे.
असे झाले सर्वेक्षण
कालावधी - २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर
स्थलांतरित होऊन आलेली बालके - १३९
स्थलांतरित होऊन गेलेली बालके - ४१६
शासनाकडे सादर केला जाणार अहवाल
जिल्ह्यात कोरोनानंतर अनेकांचे स्थलांतर झाले असून, शाळाबाह्य विद्यार्थिसंख्येत मोठी वाढ झाली आहे. यात अनियमित शाळेत येणारा तसेच स्थलांतर झालेला विद्यार्थी यांचाही समावेश असल्याने त्यांचा शोध घेऊन त्यांना परिसरातील शाळेत प्रवेश देण्याची मोहीम शिक्षण विभागाकडून हाती घेतली होती. या संदभार्तील अहवाल शासनाकडे सुपुर्द केला जाणार आहे.
स्थलांतरित होऊन आलेली तालुकानिहाय संख्या
अचलपूर - ०५
अंजनगाव सुजी- ०६
चांदूर बाजार- २०
चांदूर रेल्वे - ०५
दयार्पूर - ०४
भातकुली -०२
धामनगांव रेल्वे - ०२
धारणी- ०८
मोर्शी- ००
नांदगाव खंडेश्र्वर - ०५
अमरावती- ४९
तिवसा - ०८
वरूड - ०५
चिखलदरा - ००
मनपा-१८
स्थलांतरित होऊन गेलेली तालुकानिहाय संख्या
अचलपूर -२३
अंजनगाव सुजी - ३९
चांदूर बाजार- ३५
चांदूर रेल्वे - ८१
दयार्पूर-००
भातकुली-०३
धामणगाव रेल्वे - ०९
धारणी- ४९
मोर्शी- ०३
नांदगाव खंडेश्र्वर- ०२
अमरावती - ००
तिवसा - २०
वरुड - ००
चिखलदरा - १६१
मनपा - ००