जिल्ह्यात सात सिंचन प्रकल्पाचे १४ गेट उघडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:17 AM2021-09-17T04:17:43+5:302021-09-17T04:17:43+5:30
अमरावती : गत आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस तसेच रोज कुठेना कुठे पावसाची हजेरीमुळे जिल्ह्यातील एक मोठा, पाच मध्यम व ...
अमरावती : गत आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस तसेच रोज कुठेना कुठे पावसाची हजेरीमुळे जिल्ह्यातील एक मोठा, पाच मध्यम व ८४ लघु अशा ९० प्रकल्पांत सरासरी ८७.७० टक्के पाणीसाठा झाला आहे. अद्यापही उर्ध्व वर्धा प्रकल्पासह जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडेच असल्याने संबंधित नदीपात्रात धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे.
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात ९७.७१ टक्के पाणीसाठा असून ३ गेट ६५ सेंमीने उघडले आहे. शहानूर मध्यम प्रकल्पात ९७.०९ टक्के पाणीसाठा असून ४ गेट २.५ सेंमीने चंद्रभागा ९४.३५ टक्के, ३ गेट ८ सेंमीने, पूर्णा प्रकल्पात ८१.९६ टक्के पाणीसाठा २ गेट ५ सेंमीने, सपन ९०५.५२ टक्के तर २ गेट ५ सेमींने उघडले आहे. पंढरी प्रकल्पात मात्र फक्त २०.८१ टक्के पाणीसाठा आहे.
बॉक्स:
८४ लघु प्रकल्पात ७५.९६ टक्के पाणीसाठा
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार ८४ लघु प्रकल्पात सरासरी ७५.९६ टक्केच पाणीसाठा साचला आहे. एका मोठ्या प्रकल्पात ९७.७१ टक्के तर पाच मध्यम प्रकल्पात सरासरी ७४.०७ टक्के पाणीसाठा साचला आहे. यंदा ९० प्रकल्पात जरी ८७.७० टक्के पाणीसाठा साचला असला तरी गत वर्षी ८९.७१ टक्के पाणीसाठा होता हे विशेष!