पुन्हा १४ कोविड केअर सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:00 AM2021-02-20T05:00:00+5:302021-02-20T05:00:00+5:30

अमरावती, भातकुली तालुक्याचे कोविड सेंटर शहरातील व्हीएमव्ही तसेच वलगाव येथे सुरू केले आहे. याशिवाय अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा, तिवसा, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आदी तालुक्यांत नव्याने सेंटर सुरू केले आहेत. यासोबत तालुकास्तरावर समन्वय पथक नेमण्यात आले असून, आशांच्या माध्यमातून घरोघरी आजारी व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. 

14 Kovid Care Centers reopened | पुन्हा १४ कोविड केअर सेंटर सुरू

पुन्हा १४ कोविड केअर सेंटर सुरू

Next
ठळक मुद्देग्रामीण भागातही निर्बंध : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रूग्णांचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपययोजनांकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची यंत्रणाही कामाला लागली आहे. कॉन्टॅक्स ट्रेसिंग तसेच डोअर टू डोअर आरोग्य तपासणी आदी उपाययोनजा राबविण्यात येत आहेत. अशातच मध्यंतरी बंद केलेली तालुक्यातील काेविड केअर सेंटर  पुन्हा सुरू करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
अमरावती, भातकुली तालुक्याचे कोविड सेंटर शहरातील व्हीएमव्ही तसेच वलगाव येथे सुरू केले आहे. याशिवाय अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा, तिवसा, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आदी तालुक्यांत नव्याने सेंटर सुरू केले आहेत. यासोबत तालुकास्तरावर समन्वय पथक नेमण्यात आले असून, आशांच्या माध्यमातून घरोघरी आजारी व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. 
लग्न समारंभातील उपस्थिती, मंगल कार्यालयात त्रिसूत्रीचा अवलंब न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यापूर्वीच्या ग्राम दक्षता समित्याही कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती सीईओ अमोल येडगे यांनी दिली. 
होम आयसोलेशनची सुविधा ग्रामीण भागातसुद्धा आहे. मात्र, अनेकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने होम आयसोलेशनमधील रुग्णांकडून बंधपत्र लिहून घेण्यात येत असून, नियमांचे उल्लघंन केल्यास २५ हजार रुपयांचा दंड व फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सीईओ अमोल येडगे यांनी सांगितले.

संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी नवी चार केंद्रे
अमरावती : महापालिका प्रशासनाने अमरावती, बडनेरा शहरात हायरिस्क व्यक्ती, संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी नवी चार केंद्रे स्थापन केली आहेत. कोविड-१९ संसर्ग झालेल्या रुग्णांच्या सहवासात आणि संपर्कात आलेल्या हायरिस्क व्यक्तींच्या संशयित रुग्णांची रॅपिड ॲन्टिजेन, आरटी-पीसीआर चाचणीची स्थानिक नवाथे स्थित महापालिका आयसाेलेशन दवाखाना, नेहरू मैदान येथील महापालिका शाळा येथे व्यवस्था करण्यात आली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने नव्याने चार केंद्रे स्थापन केली आहेत.

ही आहेत चाचणी केंद्रे
विलासनगर येथे महापालिका शाळा क्रमांक १७. 
नागपुरी गेट येथे महापालिका शाळा. 
बडनेरात पोलीस ठाण्यामागील महापालिका शाळा. 
दस्तुरनगर येथे विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय.

 

Web Title: 14 Kovid Care Centers reopened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.