मेळघाटात १४ महिन्यांत ५४१ बालमृत्यू

By admin | Published: June 5, 2014 11:40 PM2014-06-05T23:40:14+5:302014-06-05T23:40:14+5:30

कुपोषणाचा कलंक लागलेल्या मेळघाटात गेल्या चौदा महिन्यांत ५४१ बालकांचा मृत्यू झाल्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. तर २७७१ बालक तीव्र कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती आहे.

In 14 months, 541 child deaths in Melghat | मेळघाटात १४ महिन्यांत ५४१ बालमृत्यू

मेळघाटात १४ महिन्यांत ५४१ बालमृत्यू

Next

अडीच हजार बालके तीव्र कुपोषित : चिखलदर्‍यात शुक्रवारी नवसंजीवनी बैठक
नरेंद्र जावरे - अमरावती
कुपोषणाचा कलंक लागलेल्या मेळघाटात गेल्या चौदा महिन्यांत ५४१ बालकांचा मृत्यू झाल्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. तर २७७१ बालक तीव्र कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती आहे. शुक्रवारी ६ जून रोजी चिखलदरा येथे पाच विविध विभागांतील सचिवांच्या उपस्थितीत नवसंजीवनी आढावा बैठक होईल. मेळघाटातील एकूण समस्यांचा पाढा या बैठकीत वाचला जाणार आहे. १९९३ पासून सातत्याने बालमृत्यू होत असताना शासकीय योजनांची नकारघंटा कायम आहे, हे   सिद्ध झाले आहे.
नवसंजीवनी बैठक
मुंबईवरून पाठविलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी पाहण्यासाठी दरवर्षी अधिवेशनापूर्वी सचिव किंवा मंत्र्यांच्या गाड्या मेळघाटच्या घाटवळणावर फिरतानाचे चित्र जुने झाले आहे.
कुपोषण, रोजगार, आरोग्य, रस्ते, वीज या मुलभूत सुविधांचा अभाव मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात आजही कायम आहे.
 समस्यांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी चिखलदरा येथे नवसंजीवनी बैठक बोलाविण्यात आली आहे. राज्याचे आदिवासी, आरोग्य, महिला व बालकल्याण, पुरवठा आदी सचिव बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
 

Web Title: In 14 months, 541 child deaths in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.