वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात २५पैकी १४ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:18+5:302021-06-21T04:10:18+5:30

वरुड : स्थानिक ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २५ पदे मंजूर असताना यातील १४ पदे रिक्त ...

14 out of 25 posts are vacant in Warud Rural Hospital | वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात २५पैकी १४ पदे रिक्त

वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात २५पैकी १४ पदे रिक्त

googlenewsNext

वरुड : स्थानिक ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २५ पदे मंजूर असताना यातील १४ पदे रिक्त आहेत. तालुक्यासह आजूबाजूच्या रुग्णांची मोठी संख्या असते, तर येथे प्रसुती, शस्त्रक्रिया, आंतर रुग्ण विभागातील रुग्णांवरील उपचार करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागतो. अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदांमुळे कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ताण वाढतो. यामुळे सदर पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी नागरिकांतून केली ज़ात आहे. ग्रामीण रुग्णालयात २५पैकी १४ पदे रिक्त असून, ११ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर रुग्णालयाची मदार आहे.

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वरुड तालुका असून, बैतुल, छिंदवाडा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्याची सीमा लागून आहे. सातपुडा पर्वताशेजारी अनेक आदिवासी खेडी आहेत. तालुक्यातून राष्ट्रीय महामार्गसुद्धा जातो. यामुळे अपघाताचे प्रमाण मोठे असून, ते ग्रामीण रुग्णालयात दाखल होतात. ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसुती, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया, अपघात, विष प्राशन रुग्ण, मोठ्या प्रमाणात असल्याने अपुऱ्या कर्मचारी व्यवस्थेमुळे रुग्णांवर उपचार करताना कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत आहे. नियमित तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने गुणात्मक आरोग्य सेवा देण्याकरिता अडचणी निर्माण होत असून, रिक्त पदांमध्ये सहाय्यक अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, औषधनिर्माता, ''क्ष'' किरण तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपिक प्रत्येकी एक, अधिपरिचारिका ७, कक्ष सेवक ४, कंत्राटी पदांमध्ये अधिपरिचारिका (न्यू बॉर्न स्टॅबिलायझेशन युनिट, नॉन कॉम्युनल डिसीज), एक महिला वैद्यकीय अधिकारी (राष्ट्रीय बाल विकास कार्यक्रम) या पदांचा समावेश आहे. रिक्त पदांबाबत अनेकवेळा मागणी करूनसुद्धा रिक्त पदांचा भरणा करण्यात आला नसल्याने रुग्णसेवा देताना विलंब होतो. यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन अघटित घटनासुद्धा रुग्णालयात घडत असतात. रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

* बाह्य आणि आंतर रुग्ण विभाग सांभाळणे कठीण झाले आहे. - डॉ. प्रमोद पोतदार

ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसुती, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया, अपघात, विष प्राशन रुग्ण, मोठ्या प्रमाणात असल्याने अपुऱ्या कर्मचारी व्यवस्थेमुळे रुग्णांवर उपचार करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. बाह्य रुग्ण विभागात २००पेक्षा अधिक तपासण्या होतात. आंतर रुग्ण विभागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण भरती असते. परंतु गुणात्मक आरोग्य सेवा देण्याकरिता अडचणी निर्माण होतात. वरिष्ठांकडे मागणी केली असून, रिक्त पदे भरणे गरजेचे आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी सांगितले.

Web Title: 14 out of 25 posts are vacant in Warud Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.