१४ पंचायत समितीस्तरावर आता 'वॉर रूम'
By जितेंद्र दखने | Published: May 16, 2024 06:25 PM2024-05-16T18:25:12+5:302024-05-16T18:26:06+5:30
जिल्हा परिषद : मान्सूनपूर्व तयारीसाठी ॲक्शन प्लॅन
अमरावती : जिल्हाधिकारी यांनी नुकताच मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील जनेतेच्या सुरक्षेची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची असल्याने झेडपी प्रशासन याकरिता सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील १४ पंचायत समिती स्तरावर नैसर्गिक आपत्ती आणि साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश प्रभारी सीईओ संतोष जोशी यांनी दिले आहे.
जिल्हाभरातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी नियमितपणे मुख्यालयी हजर राहण्याची सक्ती केली आहे. पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या नियंत्रणात विस्तार अधिकारी (पंचायत) यांची नोडल अधिकारी नियुक्ती केली जाणार आहे. मान्सून पूर्व नियोजनाकरिता महत्वाचे विभागांना अर्लट करत ॲक्शन प्लॅन सीईओंनी तयार केला आहे. यामध्ये आरोग्य, बांधकाम, महीला व बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत विभाग, लघुसिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा आदी विभागांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांचे मॅपींग करण्यात तेआले असून, या आरोग्य केंद्रात औषधीसाठा,अमृत आहार आणि अनुषंगिक व्यवस्था असल्याची खात्री करणे, आरोग्य केंद्र, इमारती धोकादायक असल्यास अथवा दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ बांधकाम विभागाला कळवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर रुग्णवाहिका सुस्थितीत, इंधन व वाहन चालकासह उपलब्ध आहेत याची खात्री करणे. नागरिकांना पावसाळ्यात शेतशिवार करण घरामध्ये सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचाराची व्यवस्था व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करणे, याशिवाय उपलब्ध असल्या अधिकारी यांनी तालुकास्तरावर आपत्ती आणि साथरोगतरावर नैसर्गिक वॉररूम स्थापन केली जाणार आहे.
कोट
मान्सूनपूर्व नियोजनाकरिता आमचे सर्व विभाग सज्ज आहे. महत्वाच्या सर्व विभागांना सूचना देत सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती स्तरावर वॉर रूमची स्थापना करून विस्तार अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केली जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व घडामोडींवर जिल्हास्तरावर लक्ष ठेवता येईल
- संतोष जोशी, सीईओ, जिल्हा परिषद