१४ वर्षीय मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न; कुत्र्याचे पिल्लू न दिल्याचा राग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:20 AM2020-02-29T11:20:16+5:302020-02-29T11:20:46+5:30
श्वानाचे पिलू घरी आणू न दिल्यामुळे एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने घरी शयनकक्षात ओढणीने गळफास घेतला. त्याला तातडीने अमरावती येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: श्वानाचे पिलू घरी आणू न दिल्यामुळे एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने घरी शयनकक्षात ओढणीने गळफास घेतला. त्याला तातडीने अमरावती येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शहरातील एका कॉलनीतील हा विद्यार्थी नित्यनेमानुसार प्रमाणे शुक्रवारी सकाळी शिकवणी वर्गाला गेला. ११ वाजता घरी परतल्यानंतर मला श्वानाचे पिलू घरी आणायचे आहे, असा हट्ट त्याने आईकडे धरला. घरी पिलू आणू नकोस, असे आईने बजावले. आंघोळीला पाणी गरम कर, असे आईला त्याने सांगितले. त्यानंतर आईचा मोबाईल घेऊन तो बेडरूममध्ये गेला. ओढणीने गळफास घेतला. याच सुमारास आई बेडरूममध्ये गेली असता, हे भयावह चित्र तिला दिसले. मुलाची जीभ बाहेर आली होती. लगेच त्याला धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तातडीने अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. त्याला मोबाइलवर टिकटॉक व्हिडिओ पाहण्याचा नाद असल्याची माहिती समोर आली आहे.
१४ वर्षीय विद्यार्थ्याला शुक्रवारी येथील ग्रामीण रूग्णालयात बेशुद्धावस्थेत आणण्यात आले. त्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. तसे नातेवाइकांनीही सांगितले. त्यानंतर त्याला इर्विनमध्ये हलविण्यात आले.
- महेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे