शाळांना वर्षभरात १४० दिवस सुट्टया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:38+5:302021-07-10T04:10:38+5:30
अमरावती : जिल्हा परिषद, नगर परिषद आणि खासगी प्राथमिक शाळांच्या सुट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले असून, वर्षभरात १४० शाळांना ...
अमरावती : जिल्हा परिषद, नगर परिषद आणि खासगी प्राथमिक शाळांच्या सुट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले असून, वर्षभरात १४० शाळांना सुट्या राहणार असल्याने या शैक्षणिक सत्रात २२५ दिवसच शाळा राहणार आहे.
वर्षभरात ५२ रविवार येत असून, उन्हाळी सुट्या ४६ दिवस राहणार आहेत. तसेही सद्यस्थितीत कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळा लाॅकडाऊनच आहेत. १९ सार्वजनिक सुट्यांमध्ये भाऊबीज, अक्षय तृतीया, ज्येष्ठा गौरी पूजन व सर्वपित्री अमावस्या अशा तीन स्थानिक सुट्या शाळांना राहणार आहे. सोबतच स्थानिक ६ सुट्या असून, दिवाळीच्या १३ दिवसांच्या सुट्या राहतील. ३६५ दिवसातून १४० दिवस सुट्या राहणार असल्याने शालेय कामकाजाची प्रत्यक्ष दिवस २२५ राहील. २००९ प्रमाणे एकूण वार्षिक कामकाजाचे तास प्राथमिक स्तर ८००, तर उच्च प्राथमिक स्तर १००० घड्याळी तास आहेत. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाने आदेश जारी केला आहे.