१४५ शिक्षकांची पेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:55 PM2018-07-18T23:55:09+5:302018-07-18T23:55:46+5:30

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या व चुकीची माहिती सादर करणाऱ्या जिल्हाभरातील १५४ शिक्षकांची बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान १४ शिक्षक बदलीपात्र असतानाही अर्ज न भरल्याने त्यांची बदली करून बडतर्फीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना दिले आहेत.

145 teachers' cells | १४५ शिक्षकांची पेशी

१४५ शिक्षकांची पेशी

googlenewsNext
ठळक मुद्देसीईओंनी विचारला जाब : अर्ज न भरणाऱ्या १४ शिक्षकांचा बडतर्फीचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या व चुकीची माहिती सादर करणाऱ्या जिल्हाभरातील १५४ शिक्षकांची बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान १४ शिक्षक बदलीपात्र असतानाही अर्ज न भरल्याने त्यांची बदली करून बडतर्फीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना दिले आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आॅनलाइन बदल्या पहिल्यांदाच राज्यस्तरावरून करण्यात आल्या. या प्रक्रियेत १५४ शिक्षकांच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार १८ जुलै रोजी सायन्स कोअर शाळेत सीईओ मनीषा खत्री, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर, उपशिक्षणाधिकारी वामन बोलके आदींच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. १४ शिक्षक बदलीस पात्र होते. परंतु, त्यांनी बदलीसंदर्भात अर्जच भरला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या १४ शिक्षकांच्या बदल्या व त्यानंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणार असल्याचे सुनावणीदरम्यान सीईओंनी स्पष्ट केले. याशिवाय अनेक शिक्षकांनी कार्यमुक्त झाल्यानंतर रजा टाकली. नव्या नियुक्तीच्या ठिकाणी ते अद्यापही रूजू झाले नाहीत. अशा सर्व शिक्षकांच्या रजा रद्द करण्याचे आदेश देत, तात्काळ रुजू होण्याचे आदेश सीईओंनी बजाविले आहेत. काहींनी वैद्यकीय रजेचा अर्ज टाकून रुजू होण्याचे टाळले.
अशा शिक्षकांनी आठ दिवसांत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करायचे आहे. प्रमाणपत्र सादर न करणाºया शिक्षकांना मेडिकल बोर्डापुढे हजर केले जाईल. तथ्य न आढळल्यास त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित होईल. जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरणाºया जवळपास ३०० शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली होती. पडताळणीअंती यामध्ये १५४ शिक्षक प्राथमिक तपासणीत दोषी आढळून आले होते. त्यामुळे या शिक्षकांची सीईओंच्या आदेशावरू न सुनावणी ठेवण्यात आली होती. यात १४ शिक्षकांचे पितळ उघड झाले आहेत.

...तर गटशिक्षणाधिकाºयांवरही कारवाई
शिक्षक बदलीप्रक्रियेत ज्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयाने शिक्षकांची बदलीसंदर्भात जिल्हा परिषदेला लेखी माहिती सादर केली नाही, अशा गटशिक्षणाधिकाºयांवर कारवाई करण्याचे फर्मान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सोडले आहे.

शिक्षक बदलीप्रक्रियेत पहिल्या टप्प्यात ६० शिक्षकांची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर दुसºया टप्प्यात चुकीची माहिती भरणाºया १५४ जणांची सुनावणी घेतली. यात १४ शिक्षक दोषी आढळून आले. त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाईल.
- मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद

Web Title: 145 teachers' cells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.