शेतकºयांना १५ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:15 PM2017-10-25T23:15:26+5:302017-10-25T23:15:38+5:30

15 crore rupees to farmers | शेतकºयांना १५ कोटींचा फटका

शेतकºयांना १५ कोटींचा फटका

Next
ठळक मुद्देडोळ्यादेखत लूट : दोन लाख क्विंटल खुल्या बाजारात

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नाफेडच्या केंद्रांसाठी आॅनलाइन नोंदणी होत असताना प्रत्यक्षात खरेदी सुरू नसल्याने शेतकºयांना बाजार समित्यांकडे धाव घ्यावी लागली. यंदाच्या हंगामात २३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख ९२ हजार १५९ क्विंटल सोयाबीन आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने व्यापाºयांना विकले गेल्याने शेतकºयांना किमान १५ कोटींचा फटका बसला आहे.
आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खुल्या बाजारात सोयाबिनची मोठ्या प्रमाणात विक्री केली. विक्रीसाठी येणाºया सोयाबीनचा ओघ अद्यापही तसाच कायम आहे. यंदा सोयाबीनला तीन हजार ५० रुपये आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. बाजार समित्यांसह खुल्या बाजारात शेतकºयांच्या निकडीचा खरेदीदारांनी फायदा घेत हमीपेक्षा ५०० ते हजार रुपये प्रतिक्विंटल कमीने खरेदी केल्याने शेतकºयांचे किमान १५ कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. बाजार समितीसह सहकार विभागाचे नियंत्रण व्यापाºयांवर नसल्याने दररोज शेतकºयांची लूट होत असताना कोणाकडूनही जाब विचारला गेला नाही, हे येथे उल्लेखनीय.
यंदाच्या हंगामात पेरणीपासूनच पावसाची तूट असल्याने शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. त्यानंतरही पावसाचा ताण राहिला. त्यातून जे सोयाबीन बचावले त्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. पावसाबाबत अतिसंवेदनशील समजल्या जाणाºया सोयाबीन बहरावर असताना व शेंगा पक्वहोण्याच्या काळात पाऊस न आल्याने शेंगा कमी लागल्या व पोचट राहिल्या. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. यंदाच्या हंगामात उत्पादन खर्चही निघणे कठीण व्हावे, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी बाजार समित्यांमध्ये सोयाबीन नेल्यावर व्यापाºयांनी भाव पाडले.
१५ कोटींच्या फटक्याचे गणित
२३ आॅक्टोबरला अमरावती बाजार समितीत २३५० ते २५५०, नांदगाव खंडेश्वरला १८०० ते १६००, चांदूर रेल्वे १८०० ते २६५०, मोर्शी १८०० ते २५००, दर्यापूर १६५० ते २६२० व अचलपूर बाजार समितीमध्ये २२०० ते २६५० रूपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. यंदा आधारभूत किंमत ३०५० रूपये असताना जिल्ह्यात सरासरी २२०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला व आतापर्यंत दोन लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याने शेतकºयांना आधारभूत दराच्या तुलनेत किमान १५ कोटींचा तोटा झाला.
सोयाबिनची बेभाव विक्री
आॅनलाईन नोंदणी, मात्र खरेदी बंद

जिल्ह्यात नाफेडच्या पाच केंद्रांवर साधारणपणे तीन आॅक्टोबरपासून सोयाबीन, तूर, मूग व उडदासाठी शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी सुरू झाली. १६ आॅक्टोबरनंतर या केंद्रांवर फक्त मूग व उडदाची खरेदी सुरू करण्यात आली. यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी असल्याने मूग व उडदाचा पेरणी क्षेत्र कमी आहे. या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र जास्त असताना व सोयाबीनचा हंगाम सुरू असतानासुद्धा शासनाद्वारा खरेदी करण्यात आलेली नाही.
ग्रेडर उपलब्ध नसल्याचा केवळ देखावा
नाफेडच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदी करण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले. यवतमाळ येथे सोमवारच्या दौºयात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्यानंतरही जिल्ह्यात सोयाबीनची खरेदी सुरू झालेली नाही. ग्र्रेडरच उपलब्ध नसल्याचे कारण दर्शवित यंत्रणेद्वारा शेतकºयांची दिशाभूल करण्यात आली. मात्र, गुरूवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा दौरा असल्याने सोयाबीनची खरेदी करण्याचा देखावा यंत्रणेद्वारा सुरू आहे.
यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवक
यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये २३ आॅक्टोबरअखेर १,९२,१६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये अमरावती बाजार समितीमध्ये १,०६,६८९ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर ४,५४६, चांदूर रेल्वे ५,१०९, चांदूर बाजार ६,७६७, मोर्शी ५,८१२, वरूड २१०, दर्यापूर ३,७८३, अंजनगाव सुर्जी ४,१३०, अचलपूर बाजार समितीमध्ये २,०६७ क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे.

Web Title: 15 crore rupees to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.