कांद्याचे १५ लाख उपलब्ध, सोयाबीनचे १२ कोटी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:13 AM2017-07-20T00:13:41+5:302017-07-20T00:13:41+5:30

बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या कांद्यासाठी १५ लाख एक हजार ८१४ रूपयांचे अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे.

15 lakhs of onion available, 12 crores of soybean? | कांद्याचे १५ लाख उपलब्ध, सोयाबीनचे १२ कोटी केव्हा?

कांद्याचे १५ लाख उपलब्ध, सोयाबीनचे १२ कोटी केव्हा?

Next

३८ हजार शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर : सहा लाख क्विंटलला मिळणार अनुदान
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या कांद्यासाठी १५ लाख एक हजार ८१४ रूपयांचे अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. मात्र, ३८ हजार ७९१ शेतकऱ्यांच्या सहा लाख आठ हजार २८८ क्विंटल सोयाबीनसाठी आवश्यक असणारे १२ कोटी १६ लाख ५७ हजार ५२० रूपयांचे प्रस्ताव मंजूर असले तरी अनुदान अप्राप्त आहे. विदर्भाचे ‘कॅश क्राप’ असणाऱ्या सोयाबीनचे अनुदान उपलब्ध करण्यात शासन दुजाभाव करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
१ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समितीमध्ये विक्री करण्यात आलेल्या सोयाबीनला प्रती क्विंटल २०० रूपये व २५ क्विंटल मर्यादेत अनुदान शासन देणार आहे. यासाठी जिल्ह्यातून साधारणपणे ४५ हजार ४७ प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयांना सादर झाले होते. या प्रस्तावांची तालुकास्तरावर सहाय्यक निबंधकाच्या अध्यक्षतेखाली समितीने आणि जिल्हा उपनिबंधकाच्या अध्यक्षतेखाली समितीने जिल्हास्तरावर पडताळणी केली. यामध्ये अमरावती, धामणगाव रेल्वे बाजार समितीचे प्रस्तावांची संख्या सर्वाधिक असल्याने या पडताळणीला वेळ लागला. जिल्हा उपनिबंधकांनी प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. येत्या आठवड्यात सोयाबीनचे अनुदान प्राप्त होण्याची शक्यता आहे.
गतवर्षीच्या खरीपात सोयाबीनचे तीन लाख हेक्टरवर पेरणीक्षेत्र होते. तसेच सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे उत्पादकता देखील वाढली. मात्र हंगामात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची जशी आवक वाढली तसा व्यापाऱ्यांनी भाव पाडला. अगदी दोन हजार रूपये प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीनची बेभाव खरेदी करण्यात आल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे शासनाने आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या सोयाबीनला अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने हे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच अनुदान प्राप्त होणार आहे.

कांदा अनुदान जमा करण्यास २० जुलै ‘डेडलाईन’
जिल्हातील बाजार समित्यांमध्ये जुलै व आॅगस्ट २०१७ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली. त्या पात्र शेतकऱ्यांना प्रती व्किंटल १०० रूपयांच्या मर्यादेत २०० क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यात फक्त अमरावती बाजार समितीमध्ये या कालावधीत कांद्याची विक्री झाली होती. यासाठी पणन संचालक आनंद जोगदंड यांच्या आदेशाप्रमाणे अमरावती जिल्ह्यासाठी १५ लाख एक हजार ८१४ रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. २० आॅगस्टच्या पूर्वी हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. कांद्यासाठी नाशिक, लासलगाव भागालाच फायदा होत आहे. मात्र,विदर्भाचे मुख्य पीक असणाऱ्या सोयाबीनला डावलले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

Web Title: 15 lakhs of onion available, 12 crores of soybean?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.