Nagar Panchayat Election : दुपारी दीडपर्यंत तिवस्यात ३२.३३ टक्के, भातकुलीत ४९.६३ मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 02:06 PM2021-12-21T14:06:11+5:302021-12-21T14:23:11+5:30

तिवसा व भातकुली नगरपंचायतींच्या ३० सदस्यपदांकरिता मतदान होत आहे.

15 Percent Voting in tiwsa nagar panchayat elections till 11.30 | Nagar Panchayat Election : दुपारी दीडपर्यंत तिवस्यात ३२.३३ टक्के, भातकुलीत ४९.६३ मतदान

Nagar Panchayat Election : दुपारी दीडपर्यंत तिवस्यात ३२.३३ टक्के, भातकुलीत ४९.६३ मतदान

Next

अमरावती : तिवसा नगरपंचायतसाठी सकाळी १.३० वाजेपर्यंत ३२.३३ टक्के मतदान झाले. तर, भातकुली नगरपंचायतीत दुपारी दीडपर्यंत ४९.६३ टक्के मतदान झाले आहे. थंडीचा कडाका सुरू असल्याने सकाळच्या सत्रात मतदानाला संथगतीने सुरुवात झाली होती.

तिवसा व भातकुली नगरपंचायतींच्या ३० सदस्यपदांकरिता मतदान होत आहे. यामध्ये १६,१८९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. याशिवाय नामाप्रची चार सदस्यपदे सर्वसामान्य प्रवर्गात रूपांतरित झाल्यामुळे या ठिकाणी १८ जानेवारीला मतदान होणार आहे. या दोन्ही ठिकाणी बहुरंगी लढत अपेक्षित आहेत.

तिवसा नगरपंचायतीचे तीन पदे सर्वसामान्य प्रवर्गात रूपांतरित झाल्यामूळे १४ सदस्यपदासाठी मतदान होत आहे. यामध्ये ४,८१७ पुरुष व ४,८७६ स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावतील. एकूण ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी तीन झोनल अधिकारी ११० मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहे. एका मतदान केंद्रावर सात असे ९८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या ठिकाणी दोन, सात व आठ या वाॅर्डातील तीन सद्स्यपदांसाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे.

Web Title: 15 Percent Voting in tiwsa nagar panchayat elections till 11.30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.