सूक्ष्म सिंचनासाठी जिल्ह्यात १५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

By Admin | Published: February 29, 2016 12:02 AM2016-02-29T00:02:13+5:302016-02-29T00:02:13+5:30

पावसाची अनिश्चितता व त्याचा पिकावर पडणारा ताण आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान....

15 thousand farmers application for micro irrigation | सूक्ष्म सिंचनासाठी जिल्ह्यात १५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

सूक्ष्म सिंचनासाठी जिल्ह्यात १५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

googlenewsNext

जलसाक्षरतेत वाढ : ठिबक, तुषार संच करणार खरेदी
अमरावती : पावसाची अनिश्चितता व त्याचा पिकावर पडणारा ताण आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान. यामुळे सूक्ष्म सिंचनासाठी कृषी विभागाकडे मागणी वाढली आहे. यंदा जिल्ह्यातील १४ हजार ६२ शेतकऱ्यांनी तुषार व ठिबक सिंचनासाठी आॅनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत.
केंद्र शासनाने सुरू केलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेला सुरुवातीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे याची जनजागृती झाली. पावसाची अनिश्चितता व पिकांचे होणारे नुकसान या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा या योजनेला प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यात १४,८६२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. विदर्भ सधन सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी विदर्भातील ८४,६६८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. तीन वर्षांपासून पावसाची अनिश्चितता व नापिकी यामुळे यंदा लाभार्थींची संख्या वाढली आहे. यावर्षी केंद्र सरकारने पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत राज्याला १७६ कोटी ७५ लाख रुपये उपलब्ध केले आहे. राज्य शासन १११ कोटी ४१ लाख देणार आहे. म्हणजेच यंदा सूक्ष्म सिंचनासाठी संच खरेदी करताना कृषी विभागाची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे कारण कृषी विभागाने समोर केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

Web Title: 15 thousand farmers application for micro irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.