अमरावती जिल्ह्यातील वडनेर गंगाईत काट्यांवरून लोटांगण घेण्याची १५० वर्षांची प्रथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:41 PM2018-03-28T12:41:19+5:302018-03-28T12:41:27+5:30
रामनवमीनिमित्त दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे दोन निस्सीम भक्तांचे रिंगणीच्या काट्यांवरील लोटांगण मंगळवारी पार पडले. ही परंपरा १५० वर्षांची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रामनवमीनिमित्त दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे दोन निस्सीम भक्तांचे रिंगणीच्या काट्यांवरील लोटांगण मंगळवारी पार पडले. ही परंपरा १५० वर्षांची आहे.
वडनेर गंगाई येथे झगेश्वर महाराजांचे मंदिर आहे. रामनवमीच्या तिसऱ्या दिवशी या संस्थाच्यावतीने आयोजित लोटांगणात गावातील सानथोर सहभागी झाले. विज्ञान युगात अंधश्रद्धेला कुठेही थारा नसला तरी काही गावांत जुन्या परंपरेची जपणूक केल्या जात आहे. लोटांगण घेतल्यावर नागरिकांना कुठल्याही प्रकारची इजा होत नसल्याची भावना भाविकांमध्ये आहे. सरपंच दिनकरराव देशमुख, संस्थानचे अध्यक्ष प्रवीण प्रभाकरराव लाजूरकर यांनी आयोजनाकरिता परिश्रम घेतले. कायदा व सुव्यवसस्था राखण्याकरिता येवदाचे ठाणेदार नितीन चरडे व त्यांचे सहकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला.
काट्यावरून लोटांगण घेणे ही कुठलीही अंधश्रद्धा नसून यामुळे आम्हाला दैव शक्ती प्राप्त होऊन एक प्रकारची शरीराला ऊर्जा मिळते. आम्हा गावकऱ्यांमध्ये ही परंपरा आजन्म सुरू ठेवून महाराजांच्या कृपेने कोणत्याही प्रकारे काट्याचा दुष्परिमाण आमच्यावर होत नाही.
- माधव चौधरी, भाविक