453 गावांत जलयुक्तची 1525 कामे अपूर्ण; पश्चिम विदर्भाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 04:28 PM2020-01-09T16:28:02+5:302020-01-09T16:28:36+5:30

४३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा यंत्रणेचा दावा

1525 Water Works completed in 453 villages; Status of West Vidarbha | 453 गावांत जलयुक्तची 1525 कामे अपूर्ण; पश्चिम विदर्भाची स्थिती

453 गावांत जलयुक्तची 1525 कामे अपूर्ण; पश्चिम विदर्भाची स्थिती

googlenewsNext

- गजानन मोहोड

अमरावती : ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र अन् टँकरमुक्त जिल्हा’ असा गाजावाजा करीत यापूर्वीच्या सरकारने ‘जलयुक्त शिवार’ ही योजना सन २०१५-१६ पासून राबविली. सद्यस्थितीत राज्य शासनाद्वारा ही योजना गुंडाळणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान या चार वर्षांत चार हजार ३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा  अंमलबजावणी यंत्रणांनी केला आहे. पश्चिम विदर्भात अद्यापही ४५३ गावांमधील १५२५ कामे अपूर्ण असल्याचे वास्तव आहे.

सलगचा दुष्काळ, नापिकी अन् पाणीटंचाई पाचवीलाच पुजली असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार हा ड्रिम प्रोजेक्ट दुष्काळबहुल जिल्ह्यांमध्ये राबविला. याअंतर्गत पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत सन २०१५-१६ मध्ये १३९६, सन २०१६-१७ मध्ये ९९७, सन २०१७-१८ मध्ये १०३५ व सन २०१८-१९ या वर्षात १३६३ असे एकूण ४७९६ गावांमध्ये ही योजना राबविली. या कालावधीत सन २०१५-१६ मध्ये ५० हजार ३८, सन २०१६-१७ मध्ये १८ हजार ७०७, सन २०१७-२०१९ मध्ये २७ हजार ८९२ व सन २०१७-१८ मध्ये १९ हजार ९०३ असे एकूण एक लाख १६ हजार ५४० जलसंधारणाची कामे करण्यात आलीत. अद्यापही ४५३ गावांमधील १५२५ कामे अपूर्ण आहेत.

या योजनेची मुदत डिसेंबर २०१९ ला संपुष्टात आलेली आहे. नव्याने गावांची निवड नाही, निविदा नाही किंवा यावर निधी आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाआघाडी सरकारला ही योजना चालविण्यात स्वारस्य नाही. नव्याने कामांना कार्यारंभ आदेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश शासनाने दिलेले आहे. अद्याप १३६७ गावांमधील कामे सुरूच आहेत. १५२५ कामे अपूर्ण आहेत. यापैकी काही कामांना कार्यारंभ आदेश दिलेले नाही. त्यामुळे ही कामे होणे जवळजवळ अशक्य मानले जात आहे.

शिवाराला कोरड ४३४३ गावे जलपरिपूर्ण कशी?

मागील पाच वर्षांत यंदाचा अपवाद वगळता चारही वर्षे पश्चिम विदर्भ दुष्काळात होरपळला आहे. अपुºया पावसाळ्यामुळे दरवर्षी दोन हजारांवर गावांना कोरड आहे. गतवर्षी ७०० टँकर सुरू होते. अशा परिस्थितीत पश्चिम विदर्भातील ४३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा जलयुक्त शिवार राबविणाºया १४ यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे या सर्व कामांचे ‘सोशल आॅडिट’ होणे महत्त्वाचे आहे. यात ‘दुधका दुध पानी का पानी’ सिद्ध होईल.

 चार वर्षांत योजनेवर २४२५.६१ कोटींचा खर्च

अमरावती विभागातील ४७९६ गावांमधील १,१६,५४० कामांवर आतापर्यंत २४२५ कोटी ६१ लाखांचा निधी खर्च झालेला आहे. किमान एका सिंचनासाठी ३,७६,३५६ हेक्टरमध्ये पाळी देता येईल, ऐवढा जलसाठा तयार झाल्याचा शासनाचा अहवाल आहे. प्रत्यक्षात यंदाचा अपवाद वगळता शेतशिवार अन् कामे कोरडेच आहे. जलयुक्तमुळे कुठे सिंचन झालेच नाही. योजनेची अंमलबजावणी करणाºया १४ यंत्रणाचे शिवार मात्र, या योजनेमुळे हिरवे झाल्याचा आरोप आज होत आहे.

Web Title: 1525 Water Works completed in 453 villages; Status of West Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.