१५ एप्रिल ते १५ जुलै रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 01:10 AM2019-03-04T01:10:44+5:302019-03-04T01:13:15+5:30

शाळा-महाविद्यालयांना सुट्या, लग्नप्रसंग, सुट्यांमध्ये मौजमजा, सहलीचे नियोजन करताना १५ एप्रिल ते १५ जुलै २०१९ दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नसल्याचाही विचार करावा लागेल. उन्हाळी विशेष गाड्या सुरू होण्याची प्रतीक्षा असताना, आता चार महिन्यांपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ‘नो रूम’ असे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकत आहेत.

From 15th to 15th of July train trains housefill | १५ एप्रिल ते १५ जुलै रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल

१५ एप्रिल ते १५ जुलै रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल

Next
ठळक मुद्देमुंबई, दिल्ली, केरळ, पुणे ‘नो रूम’ : उन्हाळी सिझन विभागाच्या पथ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शाळा-महाविद्यालयांना सुट्या, लग्नप्रसंग, सुट्यांमध्ये मौजमजा, सहलीचे नियोजन करताना १५ एप्रिल ते १५ जुलै २०१९ दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नसल्याचाही विचार करावा लागेल. उन्हाळी विशेष गाड्या सुरू होण्याची प्रतीक्षा असताना, आता चार महिन्यांपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ‘नो रूम’ असे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकत आहेत. मुंबई, दिल्ली, केरळ, पुणे या रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे कठीण झाले आहे.
रेल्वे गाड्यांचा समर सिझन (उन्हाळी हंगाम) खऱ्या अर्थाने एप्रिल ते जुलै दरम्यान सुरू होतो. या कालावधीत रेल्वे गाड्यांमध्ये पाय ठेवण्यासही जागा मिळत नाही. बाहेरगावी रेल्वेने जाणाऱ्यांना यादरम्यान रेल्वेचे आरक्षण मिळणार नाही, अशी माहिती आहे. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, भुसावळ-निझामुद्दिन गोंडवाना एक्स्प्रेस, अमरावती-पुणे, नागपूर-पुणे गरीब रथ, हावडा मेल, हावडा- एलटीटी शालिमार एक्सप्रेस, मुंबई-हावडा गितांजली, हावडा-पुणे शालिमार एक्स्प्रेस, दिल्ली व्हाया सेवाग्राम केरळ एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई दुरंतो, टाटानगर-एलटीटी सुपरफास्ट, अहमदाबाद-चेन्नै नवजीवन एक्स्प्रेसचे आरक्षण मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे.

समर स्पेशल रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा
यंदा उन्हाळ्यात समर स्पेशल नवीन रेल्वे गाड्यांना केव्हापासून प्रारंभ होते, याकडे प्रवाशांच्या नजरा लागल्या आहेत. नियमित रेल्वे गाड्या कधीच्याच हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात सहल, लग्नप्रसंग, पर्यटनस्थळी ये-जा करण्यासाठी पर्यायी रेल्वे गाड्या म्हणून समर स्पेशलकडे लक्ष लागले आहे.

रेल्वे आरक्षण पूर्वीच हाऊसफुल्ल झाल्याचे वास्तव आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नै, केरळ, गोवा मार्गे ये-जा करणाºया गाड्यांमध्ये चिक्कार गर्दी असेल, असे दिसून येते.
- शरद सयाम
वाणिज्य निरीक्षक, बडनेरा

Web Title: From 15th to 15th of July train trains housefill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे