नांदगाव पेठ येथे १६ टन गोमांस जप्त
By admin | Published: April 11, 2016 12:16 AM2016-04-11T00:16:45+5:302016-04-11T00:16:45+5:30
गोमांसाने लादलेला नागपूरवरून अमरावतीकडे जाणारा ट्रक बजरंग दल कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास अनुराधा पेट्रोल पंपाजवळ पकडला.
बजरंग दल, पोलिसांची कारवाई : मांसाचे नमुने प्रयोगशाळेत
नांदगाव पेठ : गोमांसाने लादलेला नागपूरवरून अमरावतीकडे जाणारा ट्रक बजरंग दल कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास अनुराधा पेट्रोल पंपाजवळ पकडला. आरोपी चालकास नांदगाव पेठ पोलिसांनी अटक केली असून दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने संधी साधून शोएब अहमद खान जाकीर कॉलनी अमरावती यांच्या मालकीच्या एमएच ३२ क्यू ७१३ हा ट्रक गोमांस घेऊन नागपूर येथून अमरावती येथे जाताना बजरंग दल संयोजक बाबू गहरवाल व अन्य कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना सूचना देऊन स्वत: ट्रकचा पाठलाग करून टोल नाक्याजवळील अनुराधा पेट्रोलपंप येथे ट्रक पकडला.
नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे एपीआय आर. आर. जाधव व त्यांच्या चमूंनी आरोपी ट्रकचालक रवि शंकरराव घुले (२५) याला ताब्यात घेतले. १५ ते १६ टन गोमांस असल्याची शक्यता असून शोएब अहमद खान जाकीर कॉलनी अमरावती येथे मांस घेऊन जात असल्याची कबुली चालकाने दिली.
गोमांस वाहतूक करण्याचा प्रकार म्हणजे कायद्याची अवहेलना असून यावर कडक कारवाईची मागणी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक संतोष ऊर्फ बाबू गहरवाल, रोशन बोकडे, सत्यजित राठोड, उमेश डोईफोडे, महादेव बनासुरे, गजानन तिजारे, सोनू बैस, दिलीप नागापुरे, बंटी शेंदरकर यांनी केली आहे.
(वार्ताहर)