गुरुकुंजात डेंग्यूने १६ वर्षीय बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:06 AM2021-08-02T04:06:24+5:302021-08-02T04:06:24+5:30
तालुक्यात महिनाभरात तिघांचा मृत्यू तिवसा : गुरुकुंजमधील लिटिल स्टार इंग्लिश स्कूलचे संचालक हसनखाँ पठाण यांचा मुलगा इब्राहिम पठाण (१६) ...
तालुक्यात महिनाभरात तिघांचा मृत्यू
तिवसा : गुरुकुंजमधील लिटिल स्टार इंग्लिश स्कूलचे संचालक हसनखाँ पठाण यांचा मुलगा इब्राहिम पठाण (१६) याचा शनिवारी रात्री डेंग्यूने मृत्यू झाला. श्रीगुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयाच्या प्रसूतितज्ज्ञ डॉक्टर माधुरी भोयर यांचा डेंग्यू आजाराच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा डेंग्यूने एक बळी घेतला. तालुक्यात महिनाभरात तिघांचा मृत्यू या आजाराने झाला आहे.
इब्राहिमला काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे त्याच्यावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याने नुकतेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी २० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला होता. गुरुकुंजात रविवारी सकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन आठवड्यांपूर्वी तिवसा येथील भावना प्रकाश दौंड (२६) यांचेदेखील डेंग्यूने निधन झाले. तालुक्यातील अनेक गावांत डेंग्यूचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत असल्याने आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन मोहीम राबविण्याची गरज आहे. ग्रामीण भागात नियमितपणे स्वच्छता केली जात नाही. वस्तीत उकिरडे आहेत. तिवसा शहरात दूषित पाणीपुरवठा होतो आहे. दरम्यान, शनिवारीच तिवसा नगरपंचायत कार्यालयात
शनिवारी सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी डेंग्यूबाबत प्रश्न उपस्थित करीत मुख्याधिकाऱ्यांना फटकारले होत.