विश्वासाने घरात गेली अन् सामूहिक अत्याचाराची बळी पडली; ६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 02:35 PM2022-12-18T14:35:52+5:302022-12-18T14:47:29+5:30
अमरावती - ओळखीतील महिलेने सांगितल्यानुसार एका तरूणाच्या घरी जाणे एका १६ वर्षीय मुलीचे सर्वस्व हिरावून नेणारे ठरले. तेथे आधीच ...
अमरावती - ओळखीतील महिलेने सांगितल्यानुसार एका तरूणाच्या घरी जाणे एका १६ वर्षीय मुलीचे सर्वस्व हिरावून नेणारे ठरले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या सहा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. त्या घटनेचे आपण साक्षीदार आहोत, अशी धमकी देऊन पुन्हा दोन आरोपींनी तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. सामुहिक अत्याचाराची ही घटना वरूड तालुक्यातील शेंदुरजनाघाट ठाण्याच्या हद्दीत ही ६ डिसेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी शेंदुरजनाघाट पोलिसांनी त्या सहा नराधमांविरूध्द बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. सहाही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या सहाही बलात्काऱ्यांना सहाय करणाऱ्या महिलेला देखील गजाआड करण्यात आले.
मनीष सदापुरे (२५), अमोल बोके (२४), पियुष डोके (२२), केशव वंजारी (२७), हर्षल गोहत्रे, कपिल तिडके (२४) व एक ४७ वर्षीय महिला अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते सर्व जण शेंदुरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी आहेत. आरोपी मनीष सदापुरे हा घरी बोलावत असल्याचा निरोप आरोपी महिलेने पीडिताला दिला. त्यामुळे ती तेथे पोहोचली. तेथे सदापुरे याने तिला घरामध्ये ओढले. तर, आधीच आत असलेल्या त्या महिलेने घराचे दार आतून घेतले. त्याचवेळी किचनमधून चार तरूण बाहेर आले. त्यांनी पीडिताचे हात पाय पकडून तिचे तोंड दाबले. तेथे पाचही आरोपींनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तिला जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपी मनीष सदापुरे याने त्या महिलेला फोन केला व बाहेरून लावलेला दरवाजा उघडायला लावला. त्यानंतर पीडिता जीवाच्या आकांताने तेथून बाहेर पडली.
दुचाकीवर नेऊन पुन्हा बलात्कार
सामुहिक अत्याचाराच्या त्या घटनेच्या आठ दिवसांनी आरोपी हर्षल गोहत्रे याने महत्वाचे बोलायचे आहे, असे म्हणून तिला दुचाकीने वरूड तालुक्यातील एका शिवारात नेले. तेथून त्याने कपिल तिडके नामक तरूणाला त्या शिवारात बोलावून घेतले. मला शेतात कशाला आणले, अशी विचारणा केली असता, तुझ्यासोबत मागील आठवडयात कोणी काय केले, हे आपणास माहिती असून, त्याने तिला शरीरसंबंधांची मागणी केली. वाच्यता केल्यास तिला ती घटना सर्वांना सांगू, असे धमकावले. त्यावेळी तेथे पोहोचलेल्या कपिल तिडके याने देखील तिच्यावर अत्याचार केला. तिने स्वत:ची कशीबशी सुटका करवून घेत घर गाठले. तथा पालकांकडे आपबिती कथन केली.
अत्यंत भेदरलेल्या स्थितीत ती पोलीस ठाण्यात पोहोचली होती. तिच्यावर सामुहिक अत्याचार करणाऱ्या सहाही आरोपींना तातडीने अटक केली. त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले.
- सतीश इंगळे, ठाणेदार, शेंदुरजनाघाट