१७ जोडप्यांचे शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:26 PM2018-05-04T23:26:59+5:302018-05-04T23:26:59+5:30
स्थानिक स्वराज फाऊंडेशन आणि भवानीमाता मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भवानी आश्रमशाळा प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसला : स्थानिक स्वराज फाऊंडेशन आणि भवानीमाता मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भवानी आश्रमशाळा प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळयात विविध जातीधर्माची १७ जोडपी विवाहबद्ध झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. अनिल बोंडे, पं.स. सभापती विक्रम ठाकरे, भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रत्नाकर अहेर, भवानीमाता संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. विजय खंडेलवाल, प्रेम सातपुते, युवराज आंडे, काँग्रेस नेते गिरीश कराळे, उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार, राजेंद्र पाटील, युवा व्यापारी संघाचे लोकेश अग्रवाल, पुसल्याच्या सरपंच सारिका चिमोटे, उपसरपंच अतुल बगाडे, भाजप युवा नेते विजय श्रीराव, जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष नितीन खेरडे, इंद्रभूषण सोंडे, नवोदय पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित अळसपुरे, राष्ट्रवादीचे सचिन वायकुळ, संजय श्रीराव, पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश श्रीराव, भारत खासबागे, नवोदय पतसंस्थेचे माजी अध्यक्ष देवेंद्र कांडलकर, प्रवीण उधळीकर, पूजा अग्रवाल, भोलानाथ वाघमारेसह आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी खा. तडस यांच्याकडून प्रत्येक जोडप्याला गोदरेज आलमारी, बजरंग ट्रेडिंग आणि सातपुडा जिनिंगच्यावतीने साडी-चोळी व भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी मान्यवरांनी सर्व नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. सोहळ्याकरिता स्वराज फाउंडेशन आणि भवानीमाता मंदिर संस्थानच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.