भारतात १७ टक्के नागरिक किडनी आजाराने ग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:27 PM2018-03-07T23:27:30+5:302018-03-07T23:27:30+5:30

किडनीचा आजार हा देशपातळीवर दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. १७ टक्के नागरिक किडनीच्या विविध आजारांनी ग्रस्त असल्याचा डेटा इंडियन सीकेडी रजिस्ट्रीचा असल्याची माहिती किडनी विकार तज्ज्ञ निखील बडनेरकर यांनी बुधवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेत दिली आहे.

17% of Indians suffer from kidney disease in India | भारतात १७ टक्के नागरिक किडनी आजाराने ग्रस्त

भारतात १७ टक्के नागरिक किडनी आजाराने ग्रस्त

Next
ठळक मुद्देजागतिक किडनी दिन

आॅनलाईन लोकमत
अमरावती: किडनीचा आजार हा देशपातळीवर दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. १७ टक्के नागरिक किडनीच्या विविध आजारांनी ग्रस्त असल्याचा डेटा इंडियन सीकेडी रजिस्ट्रीचा असल्याची माहिती किडनी विकार तज्ज्ञ निखील बडनेरकर यांनी बुधवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेत दिली आहे.
किडनीसंदर्भात कुठलीही समस्या वा लक्षणे आढळली, तर लघवी तपासणी व क्रियाटिनाइन ही पॅथॉलॉजी टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. ज्यांना रक्तचाप व मधुमेहाचा आजार आहे, त्यांना किडनी आजार होण्याचा धोका अधिक असतो, असेही यावेळी बडनेरकर यांनी स्पष्ट केले. त्यासाठी भरपूर पाणी पिणे, फळे-भाज्या सेवन करणे, वेदनाशामक औषधी घेणे टाळणे व काही जरी समस्या आली, तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. किडनी आजार आनुवांशिक असून शकतो. ज्यांना किडनी स्टोन आहे, त्यांनीही नेहमीत तपासण्या करणे गरजेचे आहे.
किडनी आजाराचे लक्षणे
लघवी कमी होणे, रात्री वारंवार लघवीला उठावे लागणे, अंगावर सूज येणे, सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांभोवती सूज येणे, लाल रक्ताची लघवी येणे, लघवीला फेस असणे तसेच सहा वर्षांवरील मुलांनी बिछाना ओला करणे, लघवीत जळजळ, हिमोग्लोबीनची पातळी कमी राहणे आदी किडनी आजाराची लक्षणे असू शकतात.

Web Title: 17% of Indians suffer from kidney disease in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.