दोन वर्षांत ऑन ड्युटी 17 पोलीस मृत्युमुखी, अधिकारी अन् कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 08:09 PM2018-08-06T20:09:40+5:302018-08-06T20:12:18+5:30

येथील ग्रामीण विभागातील एकूण 17 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. सन 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीतील पोलिसांच्या मृत्युप्रमाणाची ही आकडेवारी आहे.

17 police died on duty during the two years, helping hand with help | दोन वर्षांत ऑन ड्युटी 17 पोलीस मृत्युमुखी, अधिकारी अन् कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात

दोन वर्षांत ऑन ड्युटी 17 पोलीस मृत्युमुखी, अधिकारी अन् कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात

Next

चेतन घोगरे
अमरावती : येथील ग्रामीण विभागातील एकूण 17 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे दिसून येत आहे. सन 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीतील पोलिसांच्या मृत्युप्रमाणाची ही आकडेवारी आहे. अमरावती कल्याण शाखेच्या माहितीनुसार, दोन वर्षांत 17 पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. 

अमरावती ग्रामीण विभागातील पोलिसांच्या मृत्युबाबत सन 2017 मध्ये दोन मोटार वाहन अपघातात दोघांचा मृत्यू झाला, एक आत्महत्या, तर अल्पशा आजाराने चार अशा एकूण सात पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, सन 2018 मधील आतापर्यंतच्या सात महिन्यांच्या कालावधीत 10 पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामध्ये अल्पशा आजाराने तीन, मोटर वाहन चालवताना दोन, हृदयविकाराने एक, पाण्यात बुडून एक, तर दोघांनी आत्महत्या केल्या व एकाचा कर्तव्यावर मारहाणीत मृत्यू झाला. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस कल्याण निधीमधून, ज्या दिवशी मृत्युमुखी पडले, त्याच दिवशी त्यांच्या परिजनांना 12 हजारांची तत्काळ मदत देण्यात आली. दरम्यान, इतर लाभाशिवाय प्रत्येक कुटुंबातील एकजण अनुकंपा तत्त्वावर पोलीस विभागात नोकरीवर लावून घेतला जाईल, असे शासन परिपत्रकात नमूद आहे. 

अ‍ॅक्सिसच्याच खातेदारांसाठी ३० लाखांचा निधी 
अपघाती निधन झालेल्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पगारी खाते अ‍ॅक्सिस बँकेत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना अशा प्रसंगासाठी ३० लाखांचा लाभ मिळतो, तसेच ओरिएन्टल इंश्यूरन्सकडून 10 लाखांपर्यंत मदत मिळते. गत चार वर्षांपासून सेवेत रुजू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना याच बँकेत खाते काढणे अनिवार्य आहे. त्यामुळे अशाप्रसंगी सदर कर्मचारी लाभार्थी होऊ शकेल. परंतु, सन 2012 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे बँक खाते इतर (स्टेट) बँकांमध्ये होते. अशा कर्मचाऱ्यांना सदर लाभ दिला जात नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी शासनाने वेगळी तरतूद का करू नये, असा सवालही काही पोलीस कर्मचारी करीत आहेत. आतापर्यंत संदीप राठोड यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांचा लाभ मिळाला, तर पवन जाधव या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना स्टेट बँकेकडून एक लाखांची मदत मिळाली आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नऊ लाखांची मदत
चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संतोष मडावी यांचा कर्तव्यावर असताना झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यांना अमरावती ग्रामीण पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नऊ लाखांची मदत त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. कर्तव्य बजावत असताना पोलीस शिपाई संतोष मडावी हे मारहाणीत ठार झाले. त्यामुळे त्यांना शहिदाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जिल्हा ग्रामीण पोलीस विभागातर्फे शासनाकडे पाठविण्यात आला आहे. 
- एम.एन. मकानदार, पोलीस उपअधीक्षक, अमरावती ग्रामीण

Web Title: 17 police died on duty during the two years, helping hand with help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.