दोन वर्षांत कर्तव्यावरील १७ पोलीस मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 10:29 PM2018-08-07T22:29:03+5:302018-08-07T22:29:57+5:30

सन २०१७-१८ या दोन वर्षांच्या कालावधीत अमरावती ग्रामीण विभागातील एकूण १७ पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे दिसून येत आहे.

17 policemen died on duty in two years | दोन वर्षांत कर्तव्यावरील १७ पोलीस मृत्युमुखी

दोन वर्षांत कर्तव्यावरील १७ पोलीस मृत्युमुखी

Next
ठळक मुद्देअमरावती ग्रामीण विभागाचे कर्मचारी : अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून आर्थिक मदत

चेतन घोगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : सन २०१७-१८ या दोन वर्षांच्या कालावधीत अमरावती ग्रामीण विभागातील एकूण १७ पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे दिसून येत आहे.
अमरावती कल्याण शाखेच्या माहितीनुसार, दोन वर्षांत १७ पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. सन २०१७ मध्ये दोन मोटार वाहन अपघातात, एक आत्महत्या, तर चार अल्पशा आजाराने असे सात पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू झाला. सन २०१८ मधील आतापर्यंतच्या सात महिन्यांच्या कालावधीत १० पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यामध्ये अल्पशा आजाराने तीन, मोटर वाहन चालवताना दोन, हृदयविकाराने एक, पाण्यात बुडून एक, तर दोघांनी आत्महत्या केल्या व एकाचा कर्तव्यावर मारहाणीत मृत्यू झाला. या सर्व पोलीस कर्मचाºयांना पोलीस कल्याण निधीमधून, ज्या दिवशी मृत्युमुखी पडले, त्याच दिवशी त्यांच्या परिजनांना १२ हजारांची तत्काळ मदत देण्यात आली. इतर लाभाशिवाय प्रत्येक कुटुंबातील एक जण अनुकंपा तत्त्वावर पोलीस विभागात नोकरीवर लावून घेतला जाईल, असे शासन परिपत्रकात नमूद आहे.
ओरिएंटलकडून १० लाखांची निधी
अपघातात निधन झालेल्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पगारी खाते अ‍ॅक्सिस बँकेत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना अशा प्रसंगासाठी ३० लाखांचा लाभ मिळतो, तसेच ओरिएन्टल इंश्यूरन्सकडून १० लाखांपर्यंत मदत मिळते. संदीप राठोड यांच्या कुटुंबीयांना १० लाखांचा लाभ मिळाला, तर पवन जाधव या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना स्टेट बँकेकडून एक लाखांचीच मदत मिळाली आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नऊ लाखांची मदत
चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संतोष मडावी यांचा कर्तव्यावर असताना झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यांना अमरावती ग्रामीण पोलीस अधिकारी-कर्मचाºयांकडून नऊ लाखाची मदत त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली.

महाराष्ट्र शासनाकडे कर्तव्य बजावत असताना पोलीस शिपाई संतोष मडावी हे मारहाणीत ठार झाले. त्यांना शहिदाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
- एम.एन. मकानदार,
पोलीस उपअधीक्षक,
अमरावती ग्रामीण

Web Title: 17 policemen died on duty in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.