नागपूर -औरंगाबाद महामार्गावर १७ टन गॅसचा टँकर उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:19 PM2018-08-01T13:19:30+5:302018-08-01T14:50:23+5:30
मुंबईहून खापरीकडे १७ टन गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी होऊन गॅस गळती सुरू झाली. स्फोट होण्याच्या भीतीने या मार्गावरील वाहने दूरवरच थांबल्याने तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागली होती. ही घटना बुधवारी पहाटे ६.३० दरम्यान घडली.
मोहन राऊत
अमरावती : मुंबईहून खापरीकडे १७ टन गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी होऊन गॅस गळती सुरू झाली. स्फोट होण्याच्या भीतीने या मार्गावरील वाहने दूरवरच थांबल्याने तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागली होती. ही घटना बुधवारी पहाटे ६.३० दरम्यान घडली.
मुंबईहून नागपूरकडे हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस घेऊन जात असलेला टँकर क्रमांक एन.एल.ए.ए. ०४२६ अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील देवगावपासून एक किलोमीटर अांतर भारती पेट्रोल पंपाजवळ संतुलन बिघडल्याने पलटी झाला. दरम्यान मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नागपूरकडून येणारी वाहतूक धामणगाव रेल्वेमार्गे वळविण्यात आली, तर मुंबईवरून येणारी जडवाहने चांदूर रेल्वेमार्गे वळविण्यात आली.
अनर्थ टळला
गॅस भरलेला टँकर पलटी झाला त्या भागात पेट्रोल पंप व ढाबे आहेत. नजीकच्या भवनात अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ३० शिबिरार्थी सहभागी झाले. या घटनेमुळे शिबिराथिंर्ना तळेगाव दशासर येथे हलविण्यात आले. गॅसमधून गळती सुरू झाल्याने दोन किलोमीटरचा परिसर सकाळी खाली करण्यात आला. पाच किलोमीटरपर्यंत या गॅसची दुगंर्धी येत होती. धामणगाव येथील हिंदुस्थान पेट्रोलियम गॅसचे अशोक भन्साली, निखिल भन्साली, खापरी येथील क्षेत्रीय प्रबंधक महेश राम, भरारी अधिकारी, विनोद साळुंके, तहसीलदार अभिजित नाईक, नायब तहसीलदार कृष्णा सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस टाकण्याचे कार्य बातमी लिहिस्तोवर सुरू होते. तळेगाव दशासर व वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.
खड्ड्यांमुळे झाला अपघात
/>सर्वाधिक खडे असलेल्या या सुपर एक्स्प्रेस हायवेवर दररोज एक दोन अपघात होतातच. जो गॅस टँकर पलटी झाला त्या परिसरात मोठमोठे खड्डे आहेत. एका वषार्पासून या रस्त्यावरील खडे दुरुस्त करण्यात आले नाहीत.
गॅस रिफिलिंग पॉइंट होणार कधी?
मध्य रेल्वे मागार्ने पूर्वी गॅसची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र, आता मुंबई - नागपूर या सुपर एक्स्प्रेस हाय-वेवरून दररोज गॅस घेऊन जाणारे १० ते १५ टँकर जातात. मात्र खबरदारी घेणारी कंपनीची कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. दोनशे किलोमीटर अंतरावर गॅस रिफिलिंग सेंटर असणे गरजेचे आहे. गॅस टँकर पलटी झाल्या त्वरित मदत करणारी यंत्रणा गॅस कंपनीने कार्यरत करावी, अशी मागणी होत आहे.